शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

देगलूर पोटनिवडणूक पावली; दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचे एक तपानंतर मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 18:46 IST

२०१४ मध्ये एका सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या पराभवाच्या संकेताने काँग्रेसने खतगावकर यांचे तिकीट कापले आणि मोदी लाटेत प्रबळ उमेदवार म्हणून अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

ठळक मुद्दे २०१० नंतर अशोकराव चव्हाण खतगावकर यांच्या निवासस्थानीतब्बल एका तपानंतर भाऊजी-मेहुण्यांचा हा योग जुळून आला.

- श्रीनिवास भोसले

नांदेड :  राजकीय अस्तित्वामुळेच एकमेकांपासून दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचा तब्बल एका तपानंतर मनोमिलनाचा योगही राजकारणामुळेच आला. रविवारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यानंतर सोमवारी सकाळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाऊजींच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी अशोकरावांवर पुष्पवृष्टी करत खतगावकर कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जावई माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि चिरंजीव अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये सोबत काम केले. परंतु २०१४ मध्ये एका सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या पराभवाच्या संकेताने काँग्रेसने खतगावकर यांचे तिकीट कापले आणि मोदी लाटेत प्रबळ उमेदवार म्हणून अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी त्यांचा विजयदेखील झाला. मात्र, नाराज झालेल्या भास्कररावांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, २०१० पासून ते आजपर्यंत अशोकराव चव्हाण यांनी राजेंद्र नगरस्थित खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली नव्हती. तब्बल एका तपानंतर हा योग सोमवारी जुळून आला. यावेळी  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, किशोर स्वामी, सरजितसिंघ गिल, रवी खतगावकर, दीपक पावडे आदींची उपस्थिती होती.

त्यातच खतगावकर हेदेखील तब्बल सात वर्षानंतर रविवारी अशोकराव चव्हाण यांच्या घरी गेले होते. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांनी त्यांचे औक्षण करून स्वागतही केले. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकरांच्या विजयात दादांचा फायदाच होईल, असे कार्यकर्ते बोलत आहेत. मात्र, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आणि भाजपमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याने भास्करराव खतगावकर यांनी केलेली घरवापसी ही केवळ पक्षातील घरवापसी नसून चव्हाण आणि खतगावकर कुटुंबीयांचे नातेसंबंध आणखी वृद्धिंगत करणारी ठरली आहे.

चंद्रकांत पाटील यांची नास्त्याची संधी हुकलीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार भास्करराव खतगावकर यांना फोन करून मी सोमवारी नास्त्याला तुमच्या घरी येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी भास्कररावांनीही आपले स्वागत आहे, असे बोलले. परंतु, रविवारी दादांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली. आपसूकच सोमवारी खतगावकर यांच्याकडे होणाऱ्या नास्त्याची पाटील यांची संधी हुकल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

नायगाव, नांदेड उत्तरची समीकरणेही बदलतीलमाजी खासदार भास्करराव खतगावकर हे नम्र आणि सुशील नेतृत्व म्हणून त्यांना मानणारा वर्ग आहे. दादांच्या काँग्रेस प्रवेशाने देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे निश्चितच जड भरेल, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे भविष्यात नांदेड उत्तर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातही खतगावकरांमुळे कॉंग्रेसला फायदा होईल. या दोन्ही मतदारसंघात खतगावकरांना मानणारा एक वर्ग आहे.

पोकर्णां यांना कॉंग्रेस महानगर अध्यक्ष पदाच्या लॉटरीची संधीमाजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्यातच मुस्लीम आणि ओबीसी समाजासोबतचे त्यांचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार अमरनाथ राजूरकर यांना महानगराध्यक्ष पदावरून बढती देत प्रदेश कार्यकारिणीत घेतले. त्यांच्या ठिकाणी आता माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना महानगराध्यक्ष पद दिले जाईल, असे बोलले जात आहे.

... तर भाऊजी अन्‌ मेहुणीत होऊ शकते लढतभास्करराव खतगावकर यांनी भविष्यात स्वत:साठी काहीही मागणार नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. परंतु, भविष्यात त्यांची सून तथा विद्यमान जि.प. सदस्या मीनल खतगावकर यांना नायगाव अथवा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, नायगावचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार आणि मीनल खतगावकर या नात्याने मावस बहिणी पडतात. त्यामुळे भविष्यात नायगाव विधानसभा निवडणुकीत भाऊजीविरुद्ध मेहुणीची लढतही होऊ शकते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडcongressकाँग्रेस