शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

गोवर-रुबेलाकडे उर्दू शाळांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:16 IST

बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी दिल्या सूचना सना हायस्कूलबाबत मनपाचा अहवाल

नांदेड : बालकांना गोवर आणि रुबेला या रोगापासून बचावासाठी देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला या लसीकरण मोहिमेत उर्दू शाळांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर चैैतन्यनगर येथील सना हायस्कूलने तर स्पष्टपणे असहकारच केल्याने महापालिकेने याबाबत जिल्हाधिका-यांसह शिक्षणाधिका-यांनाही कळवले आहे.जिल्ह्यामध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांना लस दिली जात आहे. गोवर आजारामुळे ताप येणे, लालसर पुरळ येणे, निमोनिया, रातआंधळेपणा, मेंदूला ताप चढणे आदी गंभीर आजार होतात. तर रुबेला या आजारामुळे हाडीताप येणे, हृदयरोग, महिलांमध्ये गर्भपात होणे, बालकांमध्ये मतिमंद, मेंदूचा विकास न होणे, मोतीबिंदू, बहिरेपणा आदी आजार होतात. या सर्व रोगांवर मात करण्यासाठी १५ वर्षे वयोगटातील बालकांना लस देणे गरजेचे आहे. या लसीकरण मोहिमेला शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांनी मुख्याध्यापकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांमध्येही जागृती करुन लसीकरणासाठी मुख्याध्यापकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र शहरात असलेल्या उर्दू शाळांमध्ये या मोहिमेबाबत नकारात्मक भूमिकाच दिसून येत आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी शहरातील ७५ उर्दू शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. स्थायी समिती सभापती शमीम अब्दुला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत गोवर-रुबेला लसीकरणाचे महत्त्व समजावण्यात आले. उर्दू शाळांच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेवून गोवर-रुबेलाबाबतचे गैरसमज दूर करावे आणि या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्र्थ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत.त्याचवेळी कोणत्याही पालकाकडून गोवर-रुबेला लसीकरणासाठी संमतीपत्र बंधनकारक करु नये, असेही सुचित केले आहे. गोवर-रुबेलाबाबत मशीदमधून लाऊडस्पीकरद्वारे प्रसिद्ध करावी, प्रत्येक शाळेत स्थानिक नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे, आदी सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जबाबदारीने कार्य करावे, असेही सुचित करण्यात आले. यावेळी नगरसेवक सय्यद शेरअली अब्दुल खयुम, मोहमद नासेर, उपायुक्त विलास भोसीकर, उपायुक्त गीता ठाकरे, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसने, डॉ. वासे, लसीकरण अधिकारी डॉ. मो. बदियोद्दीन आदींची उपस्थिती होती.३६ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण२७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणात नांदेड शहरात विविध शाळांमध्ये ३६ हजार ५०० मुलांना लस देण्यात आली आहे. शहरात एकूण ४९० शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये हे लसीकरण केले जात आहे. उर्दू माध्यमांच्या शाळामध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आपल्या पाल्यांना उर्दू शाळामध्ये लस देत आहेत.लेखाधिकारी संतोष कंदेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, मिश्रक शिवकुमार बिसेन या अधिकारी, कर्मचा-यांनी उर्दू माध्यमाच्या गोकुळनगर येथील फैजुल उलूम या शाळेत लस दिली.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीSchoolशाळाcollectorजिल्हाधिकारी