शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी रिंदाचा जिवलग मित्र मॅक्सला ठोकल्या बेड्या

By शिवराज बिचेवार | Updated: July 6, 2023 19:32 IST

खंडणीच्या अनेक प्रकरणात रिंदाकडून केली मध्यस्थी

नांदेड -दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा जिवलग मित्र आणि राईट हँड समजल्या जाणाऱ्या भरत पोपटाणी उर्फ मॅक्सला विशेष तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. खंडणीसाठी रिंदाने व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर भरत पोपटाणी हाच मध्यस्थी करून खंडणीची रक्कम रिंदाकडे पाठवित होता. सातत्याने तो रिंदाच्या संपर्कातही होता. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाही त्याच्या मागावर होत्या. त्यातच विशेष तपास पथकाने त्याला शिताफीने अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याने खंडणीसाठी मागील वर्षी ५ एप्रिलला बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या केली होती. त्यापूर्वीही रिंदाने जिवे मारण्याची धमकी देवून व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली होती. बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती. या पथकाने बियाणी हत्येतील १६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दोन शार्पशुटर हे एनआयएच्या ताब्यात आहेत. परंतु त्यानंतरही रिंदाच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार सुरूच होते. त्यातच काही दिवसापूर्वी पोलिसांनी सापळा रचून रिंदाच्या नावे खंडणी मागणाऱ्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता रिंदाचा जिवलग मित्र असलेल्या भरत पोपटाणी उर्फ मॅक्सला नांदेडातून पकडण्यात आले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे रिंदाने नांदेडात किती जणांकडून आणि किती रकमेची खंडणी वसूल केली यासह अनेक खुलासे होणार आहेत.

खंडणी देणाऱ्यांचाही शोध सुरूपोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रिंदाच्या नावे खंडणी मागणे आणि देणे हे दहशतवादाला समर्थन असल्याचे स्पष्ट केले होेते. त्यामुळे खंडणी देणारेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मॅक्सने एका व्यापाऱ्याकडून ४० लाख रुपयांची खंडणी रिंदाच्या नावे वसूल केली होती. त्यानंतर ही रक्कम मॅक्सने रिंदाकडे कोणत्या मार्गाने पाठविली? मॅक्सला स्वतला त्यातील किती रक्कम मिळाली? यासह रिंदाचे नांदेडातील इतर साथीदार कोण यासह अनेक बाबी पोलिस तपासात उघड होणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादीNandedनांदेड