शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:39 IST

शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग सज्ज ८ हजार ७७३ सत्रांचे करण्यात येणार आयोजन

नांदेड : शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर रॅली, भित्तीपत्रके आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. पहिल्या दोन आठवड्यांत मनपा शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाईल. त्यानंतर पुढील दोन आठवडे बाह्यसंपर्क नियमित लसीकरण केले जाणार आहे. मोहिमेच्या शेवटच्या आठवड्यात वंचित असलेल्या स्थलांतरित मुलांना ही लस देण्यात येईल. नऊ महिने ते पंधरा वर्षांतील मुलांना गोवर, रुबेला लसीद्वारे संरक्षित केले जाणार आहे.नांदेड शहरातील १ लाख २८ हजार ९५२ तर संपूर्ण जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ८८६ लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे.८ हजार ७७३ सत्रांमध्ये या मोहिमेचे आयोजन केले असून पाच आठवड्यांच्या कालावधीत ८७५ आरोग्य कर्मचाºयांमार्फत लस दिली जाणार आहे.आतापर्यंत ह्या लस टफ या नावाने बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे अथवा एखाद्या शिबिरात शुल्क देऊन घ्याव्या लागत ; पण आता शासनाने या मोहिमेद्वारे मोफत देण्याची व्यवस्था केलेली आहे. लसीकरण झाल्यावर त्या लाभार्थी बालकाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मतदान केल्यानंतर करतात तसे मार्किंग केले जाईल. लसीकरण करताना सिरिंजचा वापर केला जाईल. प्रत्येक बालकास नवीन सिरिंज व सुई वापरून ती परत वापरण्यात येऊ नये अशी आॅटो- लॉक होऊन जाईल. सर्व इमर्जन्सी मेडिसिन असलेले कीट तेथे त्यांच्यासोबत असेल. ही सर्व दक्षता घेण्यात येणार आहे.या मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण भागासाठी ९ लाख ५० हजार डोस आवश्यक आहेत. तर महापालिका क्षेत्रासाठी २ लाख १९ हजार ७०० लस लागणार आहे. या लसीचा शासनस्तरावर पुरवठा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. मोहिमेच्या देखरेखीसाठी ग्रामीण, शहरी व महापालिका क्षेत्रात तीनशे पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यNanded zpनांदेड जिल्हा परिषद