प्रवाशांना विनामास्क संचार
देगलूर - शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या अंतरराज्यीय बस तसेच खाजगी बस सुरू असून या बसच्या माध्यमातून शेकडो प्रवासी इतर राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. या प्रवाशांची कोणतीही आरोग्य तपासणी करण्यात येत नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटलबिहारी वाजपेयी जयंती
धर्माबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती भाजपाच्या वतीने शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील करखेलीकर, भाजपा तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, माजी उपनगराध्यक्ष मोगला गौड, श्यामसुंदर झंवर, जयराम पाटील, संजय पवार, संजय पाटील शेळगावकर, अशोक पाटील बाळापूरकर आदी उपस्थित होते.
दूधकवडे यांची निवड
हिमायतनगर - वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.रविराज दूधकावडे यांची निवड करण्यात आली. तर तालुका उपाध्यक्षपदी शेख खयुम इब्राहीम, बळीराम काळे, वैजनाथ पांचाळ, संतोष खिल्लारे, गणेश सूर्यवंशी, महासचिवपदी गंगाधर वाघमारे, सचिव विलास नरवाडे, सहसचिव शुभम नरवाडे, संघटक डॉ.मनोज राऊत यांची निवड करण्यात आली.
आरोपी शोधण्याची मागणी
बिलोली - येथील असहाय्य मूकबधीर मुलीवर अत्याचार करून ठार मारलेल्या आरोपींचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. निवेदनावर आम आदमी पार्टीचे लोकसभा अध्यक्ष देवीदास शिंदे, शिवाजी हंबर्डे, इस्लामबीन सालम चाऊस, नरेंद्रसिंग ग्रंथी, सुभाष कटारे, चरणप्रीतिसंग, विजय राठोड, भारत सूर्यवंशी, शेख रहीम आदींच्या सह्या आहेत.
कागदपत्रांची जमवाजमव
किनवट - तालुक्यातील ग्रामीण भागातील भावी सरपंच पदाचे तसेच सदस्य पदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धावपळ सुरू झाली असून कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. काही गावांत ग्रामपंचायत निवडणूक नको, बिनविरोध करण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत.
रासेयोच्या वतीने स्वच्छता
अर्धापूर - शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, व्यंकटी राऊत, तानाजी मेटकर, गोरखनाथ राऊत, शरद पतंगे, मनोज पतंगे, विठ्ठल श्रृंगारे यांची उपस्थिती होती.
संत फुलाजी बाबा यांचा समाधी सोहळा
किनवट - परमहंस सद्गुरू श्रीसंत फुलाजी बाबा यांच्या दुसऱ्या वर्षीचा महासमाधी सोहळ्याचे आयोजन २४ व २५ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर संस्थान सिद्धमहायोग ज्ञानपीठ समिती पटनापूर तेलंगणा ता.उटनूर येथे आयोजित करण्यात आले होते. सोहळ्यादरम्यान ध्वजवंदन, भजन, कीर्तन, आरती, ध्यानधारणा, पालखी मिरवणूक कार्यक्रम घेण्यात आले.