शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संशयाने तो वेडापिसा झाला; पत्नी,मुलाचा खून करून स्वतः गळफास घेतला, १५ दिवसानंतर आले उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 17:26 IST

Crime in Nanded : जंगलात घडलेली ही थरारक घटना तब्बल १५ दिवसांनंतर एका लाकुडतोड्यामुळे उघडकीस आली.

हदगाव (नांदेड):  चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि १७ वर्षीय मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज तालुक्यातील टाकराळा गावाजवळील जंगलात उघडकीस आली (husband commit suicide after killing wife and children) . निर्जनस्थळी झालेली ही थरारक घटना तब्बल १५ दिवसांनंतर एका लाकुडतोड्यामुळे रविवारी उघडकीस आली. शांताराम कावळे ( ४० ), सीमा ( ३५ ) व सुजित ( १७ ) अशी मृतांची नावे असून ते हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

शांताराम कावळे हा पत्नी सीमा, मुलगा सुजित व एका गतिमंद मुलगा यांच्यासह मुंबईला राहत असे. परंतु, लॉकडाऊनपासून शांताराम कुटुंबासह हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील मुळगावी आला होता. येथेच मिळेल ते काम करून कावळे कुटुंब उदरनिर्वाह करत असे. दरम्यान, शांतारामच्या डोक्यात पत्नीच्या चारित्र्यावरून संशय निर्माण झाला. यातून त्यांचे टोकाचे वाद होत असत. २८ नोव्हेंबरला शांतारामने पत्नी आणि मुलाला मुंबईला जायचे असल्याचे सांगून टेंभी येथून बाहेर आणले. हदगाव तालुक्यातील टाकराळा गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या जंगलात निर्जनस्थळी शांताराम याने पत्नी आणि मुलाचा धारदार शस्त्राने वारकरून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली.

दरम्यान, रविवारी दुपारी टाकराळा येथील एक लाकुडतोड्या जंगलात गेला असता त्याला सुन्न करणारे हे दृष्य दिसले. त्याने वनविभाग व तामसा पोलीसांना याची माहिती दिली. सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता शांतारामचा मृतदेह गळफास घेतलेल्या तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह वार केलेल्या अवस्थेत असलेला आढळून आला. तब्बल १५ दिवसानंतर मृतदेह आढळून आल्याने ती कुजून गेली आहेत. यामुळे उत्तरीय तपासणी जागेवरच करण्यात आली. शांताराम याचा गतिमंद मुलगा नातेवाईकांकडे असल्याने बचावला. शांताराम याच्या नातेवाईकांनी आज जंगलात येऊन तिन्ही मृतदेहांवर तिथेच अंत्यसंस्कार केले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू