शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:19 IST

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत.

ठळक मुद्देसदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते.शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.

नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नव्हते. शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांच्या लढ्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३८२ शेतकऱ्यांची ३१ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. नंतरच्या काळात तो कारखाना परस्पर विकला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारी, ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हा विषय मंडळाच्या अनेक बैठकींत लावून धरला. कारखान्यावर जप्तीची कारवाई करत अनेक वेळा लिलाव केला; परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. त्यानंतर भोकर येथील शेतकरी गोविंद गोपालपल्ली यांनी कारखान्याच्या अध्यक्षाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. कारखान्याच्या अध्यक्षाला पन्नास लाख रुपये अनामत ठेवण्याच्या अटीवर जामीन मिळाला.

परंतु  कारखान्याच्या अध्यक्षाने कारखान्यात शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गायब केले. त्यामुळे सदर कारखान्याकडे असलेले ४ कोटी २२ लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचे, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता; परंतु शेतकऱ्यांकडे असलेल्या पावत्यांआधारे नवीन रेकॉर्ड तयार केले व त्याची खातरजमा करून  यादीतील ३८२ शेतकऱ्यांना  ३० लाख ८८ हजार देण्याचा निर्णय राष्ट्रीय बँक प्राधिकरणाने घेतला आहे. हे पैसे अध्यक्षांनी जमा केलेल्या जमानतीसाठीच्या ५० लाख रुपयांतून अदा करण्यात येत असून, सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर सहसंचालक विभागामार्फत टाकण्यास  सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला दिल्यासंदर्भातील पावत्या तपासण्यात येत आहेत. त्यानुसार पैसे देण्यात येणार असल्याचेही विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.

रेकॉर्ड नव्याने तयार सदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते. नव्याने रेकॉर्ड तयार केले. त्यानुसार ४५९ शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.  या सर्वांची खातरजमा करून शेतकऱ्यांच्या वारसदारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना वारस असल्याचा पुरावा देण्यासंदर्भात कळविले आहे. त्यानुसार रक्कम देण्यात येईल, अशी माहिती नांदेडच्या प्रादेशिक साखर विभागाचे बी.एल. वांगे यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेMONEYपैसा