शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केला पाहुण्यांकडेच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:30 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़पळशी येथील विवेकानंद विद्यालयात सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम असल्यामुळे हदगावच्या सीमेवरील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतला आहे़ दररोज हदगाव तालुक्यातील जवळपास ९० विद्यार्थी पैनगंगेचे पात्र ओलांडून पळशी येथील शाळेत जातात़सध्या पाऊस सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून शाळेत येवू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षकांनी केले आहे़ त्यामुळे जोपर्यंत नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत नाही़ तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला सुटीच घ्यावी लागते़ तर काही विद्यार्थी त्यानंतरही जीव धोक्यात घालून शाळेत येतात़ शनिवारी माटाळगा येथील तीन विद्यार्थी नदीपात्रातील कंबरेपर्यंतच्या पाण्यातून शाळेत आले़ परंतु सायंकाळी नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची पंचाईत झाली़ त्यानंतर शिक्षकांनी त्या मुलांचे नातेवाईक असलेल्या कुपटी, पळशी येथे नेवून सोडले़ या विद्यार्थ्यांना रात्रभर नातेवाईकांकडेच मुक्काम करावा लागला़नातेवाईकांकडे सोडण्याची जबाबदारीही शाळेतील शिक्षकांवरच येवून पडते़ पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पाणी कमी होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़मुख्यमंत्र्यांना दिले निवेदनमुख्याध्यापक राजकुमार पेंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर या प्रकाराबाबत माहिती पाठविली होती़ तसेच त्यांना ई-मेलसुद्धा केला आहे़ पिंपरी येथील ओढा ओलांडता येत नसल्यामुळे या ठिकाणी फक्त ३० फुटांचा रस्ता करुन दिल्यास अनेक विद्यार्थ्यांची सोय होणार आहे़ त्याचबरोबर माटाळगा आणि मनुला येथील विद्यार्थ्यांसाठी ५०० मीटरचा रस्ता केल्यास ही समस्या दूर होणार आहे, असेही मुख्याध्यापक पेंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़

टॅग्स :RainपाऊसStudentविद्यार्थी