शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या नवीन वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:47 IST

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून दीड वर्षांपूर्वीच्या वर्गखोली बांधकामाचा दर्जा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

- सुनील चौरे हदगाव : रावणगाव (ता. हदगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे दीड वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीच्या स्लॅबचा गिलाव्याचा मोठा भाग  अंगावर पडल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) घडली आहे.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून दीड वर्षांपूर्वीच्या वर्गखोली बांधकामाचा दर्जा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.  दुसरी वर्गातील वैभव जाधव याच्या अंगावर गिलाव्याचा भाग अचानक  पडल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुळे वर्गातील इतर विद्यार्थी घाबरून रडू लागले. शिक्षकांनी वर्गात येऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढत वैभवच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार कळविला. त्याला तामसा  येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे.

या प्रकारामुळे येथील वर्गखोली बांधकामाबद्दल पालकांनी संतप्त प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सदरील वर्गखोलीचा स्लॅब गिलावा गळून फुगल्याचे स्पष्ट झाले होते.  त्याकडे दुर्लक्ष होण्याचा फटका मंगळवारच्या दुर्घटनेमुळे वैभवला दुर्दैवाने सहन करावा लागला. सदरील वर्गखोली बांधकामाशी संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे कथित दुर्लक्ष या घटनेस कारणीभूत मानले जात आहे. याप्रकरणी कारवाई होते की मौनी भूमिका घेऊन दोषींना अभयदान दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडzp schoolजिल्हा परिषद शाळा