शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:34 IST

महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्दे२५ वर्षानंतर पुन्हा प्रक्रिया कुलगुरु उद्धव भोसले यांची माहिती३१ जुलैपर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर

नांदेड : महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या. मात्र चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परिषद निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभागृहामध्ये कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ आनंद माणूसकर (मुंबई), प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंघ बिसेन, कुलसचिव डॉ. आर. एम. मुलानी यांच्यासह परमेश्वर हासबे, ज्ञानोबा मुंडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याबाबत कुलगुरु डॉ. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण असतात. या गुणाला संधी मिळावी या हेतूने वरील नव्या अधिनियमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुका पारदर्शी मोकळ्या वातावरणात आणि भयरहीत होण्यासाठी महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. डॉ. बिसेन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावेत, याच हेतूने सदर निवडणुका घेण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांत सामाजिक जाणीवही निर्माण होईल. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नवे नेतृत्वही या माध्यमातून उदयास येईल. या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेची दर तीन महिन्याला बैठक होणार असून राष्टÑीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमधूनही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येईल.शिक्षणतज्ज्ञ माणूसकर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. सदर अधिनियम मागच्यावर्षी लागू झाला. मात्र उशीर झाल्यामुळे मागील वर्षी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. त्या यावर्षी घेण्यात येणार आहेत. एका विद्यार्थ्याला पाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असून, त्यामध्ये एक वर्गप्रतिनिधी, दुसरा अध्यक्ष, तिसरा सचिव, चौथा महिला प्रतिनिधी आणि पाचवा मागासवर्गीय प्रतिनिधी असणार आहे. वर्गप्रतिनिधी सोडून इतर चार पदे महाविद्यालयांतून निवडून द्यायची आहेत. त्यानंतर विद्यापीठस्तरावर पसंती क्रमाने या चार विद्यार्थी परिषद गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घोषणेचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.राजकीय पक्ष, संघटनांना दूर ठेवणारमहाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार चालू शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठातर्फे ३१ जुलैपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे.३० सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात येणार आहे. सर्व निवडणुका एकाच दिवशी होतील, असेही आनंद माणूृसकर यांनी सांगितले.महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर होणाºया या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत राजकीय पक्ष तसेच संघटनांना सहभागी होता येणार नाही. याबरोबरच महाविद्यालयांच्या आवारात मिरवणूक किंवा मेळावेही घेण्यास बंदी असणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबरला २५ वर्षांपेक्षा जास्त असू नये. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरिता तसेच एटीकेटी असणाºया विद्यार्थ्यांना निवडणूक लढविता येणार नसून नियमित तसेच पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असलेला विद्यार्थीच उमेदवारीस पात्र ठरेल.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीElectionनिवडणूक