शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीतल्या खेळाडूंना मिळालं 'IPL' सारखं ग्लॅमर! ८ तगडे संघ अन् लोह्यात 'LPL' चा 'फिव्हर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:47 IST

आयपीएलच्या धर्तीवर लोहा प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंचा लिलाव; विशाल जाधव ठरला ''मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर''

- गोविंद कदम

लोहा (नांदेड): आयपीएलच्या धर्तीवर गेल्या १५ वर्षांपासून लोहा शहरात क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या 'लोहा प्रीमियर लीग' (LPL) च्या १६ व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. यंदा या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंसाठी राबवण्यात आलेली जाहीर लिलाव प्रक्रिया. या लिलावात विशाल जाधव या खेळाडूवर 'रायजिंग स्टार लोहा' संघाने सर्वाधिक १४ हजार रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. विशाल या हंगामातील 'मोस्ट व्हॅल्युएबल' खेळाडू ठरला आहे.

लोहा शहराचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय माणिकराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेने १६ व्या वर्षात पदार्पण केले असून, खेळाडूंची बोली लावून संघ निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. २८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या लिलावात विशाल जाधवसह पंकज मोटरवार, राहुल चव्हाण, गौतम कापुरे यांसारख्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली.

८ संघांमध्ये रंगणार 'जंग' तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजकांनी हा उपक्रम राबवला आहे. यंदा तिरंगा वॉरियर्स, टायगर इलेव्हन, लोहा लाइन्स, रॉयल किंग्डम, फ्रेंड्स इलेव्हन, रायजिंग स्टार, मुंबई इंडियन्स आणि युवा लेजंड्स असे ८ तगडे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या लिलाव प्रक्रियेमुळे लोह्यात आतापासूनच क्रिकेटचे वातावरण तापले असून, क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Local cricketers get 'IPL' glamour in Loha's 'LPL' cricket fever!

Web Summary : Loha Premier League's 16th season kicks off with player auction. Vishal Jadhav became the 'Most Valuable' player, fetching ₹14,000. Eight teams will compete in this popular local tournament.
टॅग्स :NandedनांदेडIPLआयपीएल २०२४