शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:20 IST

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयानंतर कामाला होणार प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्च २०१७ पासून ऐरणीवर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर हा विषय मार्गी लागला आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष शहरात खाजगी कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली.शहर स्वच्छता निविदाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात एकदा नव्हे, तर दोनदा याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी दराची होती. त्याखालोखाल बंगळूरच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांचे दर होते. मात्र दुसqया क्रमांकाचे दर असलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी १२ डिसेंबर २०१७ आणि २९ जानेवारी २०१८ अशा दोन वेळा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेचा अंतिम निकाल १४ फेब्रुवारी रोजी लागला. त्यामध्ये महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. महापालिकेची प्रक्रिया योग्य ठरविली. परिणामी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास शहर स्वच्छतेच्या कामास प्रारंभ करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार सदर कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. शिवजयंतीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.कचºयाचे संकलन करणे, रहिवासी, निवास, हॉटेल, आठवडी बाजार, कत्तलखाना आदी ठिकाणाहून घनकचरा, रिक्षा, आॅटो, टिप्पर, ट्रॅक्टरने संकलित करणे तसेच दैनंदिन रस्ते सफाई व नालेसफाईसाठी कामगार पुरवणे ही मुख्य जबाबदारी सदर कंत्राटदाराची आहे. त्याचवेळी घनकचºयासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रस्ते सफाईतून जमा झालेला कचरा उचलून नेणे, शहर कचरामुक्त करणे, कचरा उचलणाºया सर्व गाड्यांना जीपीए सिस्टीम बसविणे व ते मनपा कार्यालयातील नियंत्रण कक्षात जोडणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी सुविधा द्यावी लागणार आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी व डंपिंग ग्राऊंडला टाकण्यासाठी सदर कंत्राटदारास जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत. प्रारंभी तीन महिने जुन्या वाहनांतून कचरा उचलण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र टाटा एस-९०, टाटा-४०७ टेंपो-२०, रिफ्यूज कॉम्पॅक्टर-६, जेसीबी-१, डंबर प्लेसर-२ आणि एक ट्रॅक्टर असे जवळपास १७० वाहने नव्याने खरेदी करावी लागणार आहे.या वाहनांवर ३५३ मजूरही ठेकेदाराला उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शहरातून उचलणारा प्रतिटन कचरा हा १६३१ रुपये दराने उचलला जाणार आहे.