शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'स्वारातीम' विद्यापीठाचा परीक्षा विभाग झाला हायटेक; उत्तरपत्रिकांची होतेय ऑनलाइन तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:47 IST

तब्बल दोन लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत.

नांदेड : येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा परीक्षा विभाग आता शत प्रतिशत ऑनलाइन झाला आहे. विद्यापीठात आता परीक्षा ऑफलाइन होतात. मात्र, या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची तपासणी ही ऑनलाइन होत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काही अभ्यासक्रमांसाठी हा प्रयोग करण्यात आला होता; पण आता मात्र सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर लागण्याची सोय झाली आहे. तब्बल दोन लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली की उत्तर पत्रिकांचे गट्ठे तयार केले जायचे. मग या उत्तर पत्रिका प्राध्यापक मंडळी नेमून दिलेल्या जागी बसून तपासायचे. यात अनेकदा उत्तरपत्रिका पाने एकमेकांना चिकटून तपासायचा राहून जायच्या यातून वाद व्हायचे. शिवाय या सर्व प्रक्रियेत उशीर होऊन परीक्षांचे निकाल वेळेवर लागायचे नाहीत. परिणामी ज्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठात प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना अडचणी निर्माण व्हायच्या. परंतु, आता मात्र उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धतच ऑनलाइन केल्यामुळे विद्यापीठ परीक्षेत्रातील परीक्षांचे निकाल वेळेवर लागणे शक्य झाले आहे.

उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाविद्यापीठात उत्तर पत्रिका आल्यावर त्या सर्व स्कॅन केल्या जातात. त्यानंतर त्या सर्व्हरवर अपलोड केल्या जातात. निवडक ४८ केंद्रांवर प्राध्यापक या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासतात. पहिले पान तपासल्यावरच पुढेच पान उघडते, विद्यार्थ्यांची माहिती असलेले पान स्कॅन न होता त्यावर क्यूआर कोड लावला जातो. त्यानंतर तपासलेल्या उत्तरपत्रिकेचे गुण थेट मार्कमेमोवर जातात.

उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासणीऑफलाइन पद्धतीमध्ये अनेक दोष होते. निकाल लागल्यावर बराच काळ उत्तरपत्रिका सांभाळून ठेवाव्या लागत होत्या. त्यातही जर विद्यार्थ्याने फेरतपासणीची मागणी केली तर त्याची उत्तरपत्रिका शोधण्यासाठी वेळ लागत असे; पण आता सर्व उत्तरपत्रिका स्कॅन केल्याने एका क्लिकवर कुणाचीही उत्तरपत्रिका सापडू शकते.- खुशाल सिंह साबळे, परीक्षा नियंत्रक, स्वारातीम विद्यापीठ

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्र