शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड पाईप चोरीत तपासाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:16 IST

पाईप चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे मालक शेख नजीर अहमद अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याचवेळी रविवारी तेलंगणातील मेदक पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन विश्वा इंजिनिअरिंग कंपनीच्या ५४ पाईपांची ओळख पटवली. तसेच या प्रकरणात गुन्ह्याचे कागदपत्रही घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पाईप चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे मालक शेख नजीर अहमद अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याचवेळी रविवारी तेलंगणातील मेदक पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन विश्वा इंजिनिअरिंग कंपनीच्या ५४ पाईपांची ओळख पटवली. तसेच या प्रकरणात गुन्ह्याचे कागदपत्रही घेतले आहे.होळी प्रभागात ५ मार्चच्या रात्री पाणीपुरवठा योजनेच्या कामावर चोरीचे पाईप वापरले जात असल्याची इतवारा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी १४ पाईप जप्त केले. तसेच प्लंबर शेख अब्दुल अजीज याला ताब्यात घेतले. त्यानंतर इतवारा, तेलंगणातील मेदक, अदिलाबाद पोलीस ठाण्यासह नांदेड महापालिकेनेही या प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी केली. अखेर नांदेडमध्ये पाईप चोरी प्रकरणात २२ मार्चच्या रात्री मुख्य कंत्राटदार शेख नजीर अहमद, उपकंत्राटदार शम्स ऊर्फ शेख नजीर अहमद आणि शेख अब्दुल अजीज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उपकंत्राटदार शम्स उर्फ शेख नजीर अहमद आणि शेख अब्दुल अजीज या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे शेख नजीर अहमद हे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पाईप चोरी प्रकरणात रविवारी मेदक पोलीस नांदेडमध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी इतवारा पोलिसांनी जप्त केलेल्या पाईपमधून विश्वा इंजिनिअरिंग कंपनीचे ५४ पाईप ओळखले़ इतवारा ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या कागदपत्रांची त्यांनी तपासणीही केली. त्याचवेळी आदिलाबाद पोलिसांनी शनिवारी नांदेडमध्ये येऊन चोरी प्रकरणाची माहिती घेतली. आदिलाबादमधील मेघा कंपनीचे ३१ पाईप असल्याचे यावेळी उघड झाले. अटक केलेल्या दोघांना पोलीस कोठडी मागताना इतवारा पोलिसांनी या प्रकरणात मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला आहे़पाणीपुरवठा कामाच्या नव्याने निविदाहोळी येथे दलितवस्ती निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात होते.मात्र या कामावर चोरीचे पाईप वापरले जात असल्याचा प्रकार पुढे आला. परिणामी महापालिकेने हे काम रद्द करीत काम करणाºया सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेने सदर कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. २० लाख ७४ हजार रुपये या कामासाठी मंजूर आहेत. निविदा प्रक्रियेचा तसेच वाढीव रक्कम आल्यास तो सर्व खर्च सोहेल कन्स्ट्रक्शनकडून वसूल करण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. या कामाच्या ई-निविदा भरण्याची अंतिम तारीख २६ मार्च आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाTelanganaतेलंगणा