शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अजमेर उरुसासाठी मराठवाड्यातून धावणार 'विशेष रेल्वे'; ख्वाजांच्या दर्शनाला जाणं झालं सोपं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:05 IST

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; हैदराबाद-अजमेर विशेष गाडीने प्रवाशांची चिंता मिटली.

नांदेड: अजमेर येथील जगप्रसिद्ध उरुसानिमित्त भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हैदराबाद-अजमेर-हैदराबाद दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या गाड्या नांदेड विभागातील मुख्य स्थानकांवरून धावणार आहेत.

असे आहे रेल्वेचे वेळापत्रकजाण्याचा प्रवास (गाडी क्र. ०७७३१): ही विशेष रेल्वे मंगळवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता हैदराबाद येथून सुटेल. ही गाडी नांदेड, हिंगोली, अकोलामार्गे गुरुवारी पहाटे ०२:१५ वाजता अजमेरला पोहोचेल.

परतीचा प्रवास (गाडी क्र. ०७७३२): परतीच्या प्रवासात ही गाडी शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी १८:५० वाजता अजमेर येथून सुटेल आणि सोमवारी सकाळी ११:०० वाजता हैदराबादला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबामराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम आणि चित्तोडगड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य प्रवासादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास अशा सर्व प्रकारचे डबे जोडण्यात आले आहेत. उरुसासाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Special train from Marathwada for Ajmer Urs; pilgrimage made easier!

Web Summary : To manage Urs pilgrim traffic, a special Hyderabad-Ajmer train will run via Nanded division stations. It includes stops at key Marathwada and Vidarbha stations, offering AC, sleeper, and general seating.
टॅग्स :railwayरेल्वेNandedनांदेडHingoliहिंगोली