शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीच्या वादातून पित्याचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:40 IST

शेतजमीन नावावर न केल्याने पित्याचा गळ्यावर कत्तीने वार करून खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

नांदेड : शेतजमीन नावावर न केल्याने पित्याचा गळ्यावर कत्तीने वार करून खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश एस़एस़ तोडकर यांनी सुनावली़ हा निर्णय जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला़

अर्धापूर तालुक्यातील कामठा बु़ येथे मारोती नागोबा साखरे (वय ७२) यांच्या नावे ५० गुंठे जमीन आहे़ ही जमीन आपल्या नावे करावी असा आग्रह मारोती साखरे यांचा मुलगा संभाजी साखरे याने अनेक दिवसांपासून केला होता़ मात्र वडीलांनी तो आग्रह पूर्ण केला नाही़ मारोती साखरे हे किरकोळ आजारावर गावात पारंपरिक पद्धतीने उपचार करायचे़ त्यातून त्यांना काही पैसे मिळायचे़ मुलगा संभाजीने तो व्यवसाय मी करतो, मला माहिती दे अथवा जमीन नावे करण्याची मागणी केली होती़ याच कारणावरून पिता-पूत्रात अनेकदा वादही होत होते़ 

१९ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १० च्या सुमारास वडील मारोती आणि मुलगा संभाजी हे दोघेच घरी होते, इतर कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून मुलाने वडिलास लाथाबुक्क्याने मारहाण केली़ तसेच कत्तीने गळ्यावर वार करून त्यांचा खून केला़ या घटनेत मारोती साखरे हे जागीच ठार झाले होते़ या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय डोंगरे यांनी केला़ त्यांना पो़नाक़ळके, प्रकाश कर्दनवार, पोहेकॉ नईम, सपोनि मांजरमकर यांनी सहकार्य केले़ या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले होते़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ संजय लाठकर यांनी बाजू मांडली़ तर आरोपीची बाजू अ‍ॅड़ प्रवीण आयाचित यांनी मांडली़ 

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेडMurderखूनCourtन्यायालय