शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांची उद्योगाकडे वाटचाल; कृषी केंद्र अन् शेतकऱ्यांमधील दुवा म्हणून करणार काम

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: January 8, 2024 18:55 IST

सोसायट्यांना १५१ प्रकारचे व्यवसाय करता येणार  

नांदेड :  गावोगावच्या विकास सोसायट्यांना एफपीओ सक्षम करण्यासाठी किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. संगणकीकृत झालेल्या  प्रति तालुका दहा याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील १६० विकास सहकारी सोसायट्यांना प्राधान्याने किरकोळ खते-बियाणे विक्रीचे परवाने देण्यात आले आहेत. या सोसायट्या जिल्ह्यातील कृषी केंद्र आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात ९३३ सहकारी सोसायट्या असून, आजपर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त सेवा सहकारी सोसायट्यांनी खत-बियाणे विक्री, तसेच शेतीशी निगडित विविध १५१ प्रकारच्या व्यवसाय परवान्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी प्रति तालुक्यातून दहा याप्रमाणे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सुरुवातीला जिल्ह्यातील १६० सहकारी विकास संस्थाना किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येणार आहेत. तसे संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असले तरी अद्याप एकाही सोसायटीने मागणी केलेली नाही. 

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गावोगावी विकास सोसायट्या जिल्हा बँकांशी संलग्न आहेत. याच विकास सोसायट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करतात. तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप करणे व त्याचा भरणा वेळेत करून घेऊन नव्याने कर्ज दिले जाते. परंतु, मागील काही वर्षांत जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सोसायट्यांना म्हणावा तसा कर्ज पुरवठा होत नव्हता. पण, आता जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सुधारली असून, सोसायट्यांना पूर्ववत संजीवनी मिळाली आहे. या निर्णयामुळे गावातच खते - बियाणे मिळणार आहेत. 

सोसायट्यांना १५१ प्रकारचे व्यवसाय करता येणार  व्यवसायासाठी निवडण्यात आलेल्या विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकास सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे १५१ व्यवसाय गावात करण्यासाठी परवाने देण्यात येणार असून, त्या-त्या गावात खत विक्री या विकास सोसायट्याच करणार आहेत. नांदेड जिल्ह्यात विकास सोसायट्यांची संख्या ९३३ इतकी आहे. 

खत-बियाण्यांचा परवाना कृषी विभाग देणार सोसायट्यांना खते-बियाणे विक्रीचा परवाना कृषी खात्याकडून देण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी