शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत एकाही बालमजुराचा शोध लागला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़

ठळक मुद्देबालमजुरी वाढतेय, बालमजुरांसाठी वय झाले १८ वर्षे मागील वर्षी सापडला एक बालकामगार

भारत दाढेल ।नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी बालवयातच मजुरी करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही़ परंतु, प्रशासन सुस्त झाल्याने मागील सहा वर्षांत जिल्ह्यात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ गतवर्षी दोन ठिकाणी तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी एक बालमजूर कामगार कार्यालयाने मुक्त केला़बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील काही वर्षांत बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजूर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक जिल्ह्यात आहेत़ आई, वडिलांच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित, वंचित जाती-जमातीची मुले बालमजुरीकडे वळतात़या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने सन २०१६ ला बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यानुसार १४ वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे़१४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय करण्यास लावणे आणि प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत़ आता १८ वर्षांखालील बालक बालमजूर म्हणून गणल्या जात आहे़४०० रूपये शिष्यवृत्तीबालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमावतात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही वडिलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़ कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बालमजुरांची पाहणी केली जाते़ त्यानुसार २०१२ ते २०१७ या वर्षात एकाही बालमजुराची नोंद झालेली नाही़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील वर्षी एका बालमजुराला पकडण्यात आले होते़काय सांगतो कायदा...?१४ वर्षांखालील बालकास व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असून फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकते़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा़ किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा़

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक