शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे मानकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:50 IST

दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.

कंधार : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपला परंपरागत भक्तिभाव गारठ्यात जतन करत असल्याचे समोर आले आहे.दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगावची खंडोबा यात्रा आपल्या खास वैशिष्ट्याने उत्तर भारतातील भाविक - भक्तांचे आकर्षण ठरले आहे. उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी आपला घोडेबाजार आता सर्वांना आकर्षण वाटणारा निर्माण केला आहे. पूर्वीचे यात्रेचे स्वरूप आता कालौघात बदलले आहे. महिनाभरची यात्रा मोजक्या दिवसांवर आली. परंतु, यात्रेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाने कलावंत, भाविक, शेतकरी, शेतमजूर, भटके विमुक्त आदींसाठी नानाविध कार्यक्रम एक मेजवाणी ठरते.यात्रा परिसर, मंदिर परिसर, धर्मशाळा, पालखी रस्ता, पशुधन शेड, सभामंडप, वाहनतळ, भोजनगृह आदींची सोयी झाली आहे. माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी विकासासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे अनेक कामे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी उपलब्ध करून दिला. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा केला. यात्रा विकासासाठी प्रयत्न केले. या कामात मात्र मानकरी दुर्लक्षित राहिले, अशीच परिस्थिती आहे.यात्रेची सुरूवात करणारे, पागोटे (मुंडासे) मुख्य पालखीत ठेवल्या शिवाय पालखी मिरवणूक निघत नाही. सट व देवस्वारी या दोन्हीवेळी पानभोसीच्या भोसीकर कुटुंबाचा ‘मुंडासेमान’ असतो. आणि नवीन मुंडासे वस्त्र कुरूळा येथील महाजन आणतात. छत्रीचे मानकरी शिराढोण येथील पांडागळे हे आहेत. मुख्य पालखीसमोरची पालखी मानकरी हे रिसनगावचे नाईक आहेत. या मानकºयाशिवाय यात्रा अपूर्ण आहे. परंतु, या मानकºयांना माळेगावात अद्याप पक्का निवारा उपलब्ध करून देता आला नाही. स्वत: व गावातील सोबत आलेल्या भाविक - भक्तांना राहुटीत गारठ्यात रात्र काढावी लागते. पदरमोड करून गावकºयांना दिलासा द्यावा लागतो. कोटीचा खर्च, विविध बांधकामे होत असताना मानकरी केंद्रस्थानी येणे गरजेचे आहे. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. आता रिसनगावच्या नाईकांना २५ लाखांतून सभागृह बांधून दिले जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. इतर तीन मानकºयांना असा योग कधी येणार? असा सवाल मानक-यांच्या गावातून व भाविक - भक्तांतून केला जात आहे.

पक्का निवारा नसल्याने मानक-यांची परवडमुंडासे (पागोटे), पूजा अर्चा, अभिषेक आदींचा मान अनेक पिढीपासून कुटुंबाकडे आहे. यात्राकाळात गावकºयांसोबत शेकडो जण असतात. परंतु, निवारा पक्का नसल्याने त्रास होतो. खर्च पदरमोड करावा लागतो. आता सततच्या दुष्काळाने आर्थिक ताण सहन होत नाही. निवारा व खर्च तरतूद केली तर सोयीचे होईल - खुशालराव भगवानराव पा.भोसीकर, पानभोसी ता.कंधारश्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मानक-यांना निवारा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. रिसनगावच्या नाईक यांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाखांचे सभागृह मंजूर झाले आहे. इतर मानकºयांना तशी सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा निवेदनाद्वारे करणार आहे -विजय वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य, माळेगाव, ता.लोहा)

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळे