शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओबोसींना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना निवडणुकीतून जागा दाखवा: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:28 IST

प्रस्थापित पक्षांनी ओबीसींना केवळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एवढ्यावरच प्रस्थापित पक्षांनी मर्यादित ठेवले आहे.

- शेख शब्बीरदेगलूर :  प्रस्थापित पक्षांनी ओबीसींना डावलून केवळ मराठ्यांच्या हिताचे राजकारण केल्याचा आरोप ओबीसी आरक्षण नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन हाके यांनी यावेळी केले. ते ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात बोलत होते.

''विचार उद्याचा ओबीसींच्या भवितव्यांचा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा'' हे ब्रीदवाक्य घेऊन ओबीसी आरक्षण बचाव मेळावा आज, मंगळवारी दुपारी येथील मोंढा मैदान येथे पार पडला. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या ६० % जमाती ओबीसी आहेत. मात्र, प्रस्थापित पक्षांनी ओबीसींना केवळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एवढ्यावरच प्रस्थापित पक्षांनी मर्यादित ठेवले आहे. आमदारकी,  खासदारकीचे लाभाचे पद आपल्याकडे ठेवून ओबीसींना लाभाच्या पदांपासून प्रस्थापितांनी वंचित केले. राज्यात केवळ मराठा समाजाच नाही तर इतर अन्य ओबीसी समाजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण ओबीसी समाज एक झाला तर मराठ्यांची मक्तेदारी नक्कीच संपुष्टात येणार, असा दावा हाके यांनी केला. 

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेच्या उपोषणाला भेट देण्यासाठी राज्य सरकारमधील अनेक मंत्री, नेते आले. नांदेड जिल्ह्यातील तर अनेक नेत्यांनी जरांगे यांची भेट घेऊन आपली जात जोपासण्याचे काम केल्याचा टोला हाके यांनी नाव न घेता लगावला. मात्र, याचवेळी ओबीसी समाज हा संकटात असताना सुद्धा या सरकारमधील एकही नेता समाजाच्या समर्थनार्थ पुढे आला नाही. त्यामुळे आता मतभेद विसरून ओबीसी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन हाके यांनी केले.  

ओबीसी समाजाचे जास्तीतजास्त आमदार निवडून आणातर प्रा. एकनाथ वाघमारे यांनी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला इडब्ल्यूएस मधून दहा टक्के आरक्षण मिळत असताना सुद्धा जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसीच्या आरक्षणांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. १८ जूनला जातीयवादी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, माझा ओबीसी समाज जागरूक होऊन एकत्र आल्याने हा अध्यादेश टळला आहे. मात्र आज घडीला मराठा समाजास जवळपास ५७ लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. त्यास या जातीयवादी सरकारचे संपूर्ण सहकार्य लाभत आहे. लोकसभा निवडणुकीत ओबीसीचे अनेक उमेदवार पाडण्यात आले. त्यामुळे एससी, एसटी, अल्पसंख्यांक  समाजाला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसीचे जास्तीतजास्त आमदार सभागृहात पाठवण्याचे आवाहन वाघमारे यांनी केले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेNandedनांदेडOBC Reservationओबीसी आरक्षण