शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अर्धापूर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 19:27 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

- गोविंद टेकाळे अर्धापूर (नांदेड) : शेतीवर येणारी सततची संकटे यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी या विवांचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. एकाच दिवशी दोन घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गारपीट, हवामानातील बदल, नापिकी, वादळी वारे विविध रोगांचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस आदी मुळे शेतातील पिकाचे नुकसान, नेहमीच घाट्यात येत असलेली शेती, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा व बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सापडलेल्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव व बारसगाव येथील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पिंपळगाव महादेव येथील साहेब व्यंकटराव देशमुख (वय ५७) या अल्पभूधारक शेतकऱ्याने अस्मानी संकटामुळे शेतीचे सतत होणारे नुकसान व भारतीय स्टेट बँक शाखा नांदेड चे डोक्यावर असलेले कर्ज या विवंचनेत शेतकऱ्याने बौध्द स्मशानभूमी परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठ दिवसांपासून देशमुख हे तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील बजरंग शिवराज बारसे वय ४९ वर्ष हे होमगार्ड असून नोकरीसह शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांची बारसगाव शिवारात गट नंबर ८९ मध्ये दोन एकर शेती मयताचे वडील शिवराज बारसे यांच्या नावे असून या शेतीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अर्धापूर चे ३ लाख २० हजार रुपये कर्ज  असल्याने व सततच्या अस्मानी संकटामुळे तोट्यात येत असलेली शेती यामुळे कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा उद्धार निर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत बजरंग शिवराज बारसे यांनी दि.२४ बुधवार रोजी दुपारी औषध प्रशासन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

तालुक्यातील दोन्ही ठिकाणी आत्महत्या केलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पाटील व संतोष सूर्यवंशी यांनी पंचनामा करून मयतांचे शव पुढील प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविले सदर प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडagricultureशेती