शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! वाळू तस्करी रोखणाऱ्या महिला पोलीस पाटलास माफियांची बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:49 IST

. पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राज्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

ठळक मुद्देमाहूर तालुक्यातील वाईबाजार येथे पोलीस पाटील आशा बळीराम मोरे या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पार्डी रोडवर थांबल्या होत्या. ट्रॅक्टरवरील इमरान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने महिला पोलीस पाटील मोरे यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण केली. 

नांदेड- वाळू चोरी रोखण्यासाठी पुढे आलेल्या महिला पोलीस पाटील यांना वाळू तस्करांकडून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राज्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. पोलीस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलीस पाटलांनाही नुकतेच संरक्षण देण्यात आले आहे. या पत्राआधारे हा गुन्हा नोंदविण्यात आला.

माहूर तालुक्यातील वाईबाजार येथे पोलीस पाटील आशा बळीराम मोरे या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पार्डी रोडवर थांबल्या होत्या. त्यावेळी पडसा येथील ट्रॅक्टर पैनगंगा नदी पात्रातून पडसामार्गे वाई बाजार येथे वाळू घेऊन आला असता पोलीस पाटील मोरे यांनी वाळू वाहतुकीसाठी रॉयल्टी भरली आहे का, अशी विचारणा केली असता ट्रॅक्टरवरील इमरान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने महिला पोलीस पाटील मोरे यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण केली. 

याप्रकरणी पोलीस पाटील आशा मोरे यांनी सिंदखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे तसेच वाळू चोरीचा गुन्हा सिंदखेड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करीत आहेत. दरम्यान, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, पोलीस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलीस पाटलांना आता संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांची कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यात प्रशासनाला महत्त्वाची मदत मिळेल, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूNandedनांदेड