Shock of lightning stars; The death of a woman | विजेच्या तारेचा धक्का; महिलेचा मृत्यू
विजेच्या तारेचा धक्का; महिलेचा मृत्यू

हिमायतनगर (जि़ नांदेड) : जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला़ तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मौजे टेंभी येथील शिवारात घडली़
टेंभी शिवारात जिजाबाई पोपलवार यांच्या शेतात अनेक दिवसांपासून थ्रीफेजच्या अर्थींगची तार पंधरा दिवसांपासून तुटून पडलेली आहे़ यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारही केली होती़ दरम्यान, सोमवार (दि़१६) सकाळी ११़२० च्या सुमारास पुनेरथाबाई कलोरे (५०) कामासाठी जात असताना शेतात सर्व्हे नंबर २६९ मध्ये पडलेल्या विद्युत तारेला त्यांच्या पायाचा स्पर्श झाला़ यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांच्यासोबत असणाºया शेषकलाबाई गंगा तंडेवाड यांनाही तारेचा धक्का बसला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत़

Web Title: Shock of lightning stars; The death of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.