शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहून रात्रीबेरात्री येणाऱ्या रुग्णांवर केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:06 IST

गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक राष्ट्रीय उपक्रमांत त्यांचा मोठा वाटा दिसून येत आहे़

नितेश बनसोडेश्रीक्षेत्र माहूर : गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक राष्ट्रीय उपक्रमांत त्यांचा मोठा वाटा दिसून येत आहे़ त्यांना कर्तव्यदक्ष परिचारिका म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी संबोधत असतात़माहूर तालुक्यातील वानोळा येथे सध्या कार्यरत असणाºया परिचारिका पी़ के़ भगत यांची २ आॅगस्ट १९८४ ला मांडवी येथे नेमणूक झाली़ त्यानंतर माहूर प्रा़आ़ केंद्र लोहगाव, आष्टा, सिंदखेड, दहेलीतांडा या ठिकाणी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले़ गरजू, गोरगरीब रुग्णांना औषधी-गोळ्या देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली़ याशिवाय अनेक गर्भवती महिलांची प्रसूती सुलभतेने करण्याचे कार्यही त्यांच्या हातून घडले आहे, नव्हे घडत आहे़त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात गरोदर मातांची १०० टक्के नोंदणी करून लसीकरण केले़ तसेच आरोग्य सुविधा पुरविल्या़ त्याआधी गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून घेतली़ एवढ्यावरच न थांबता प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित योजनेअंतर्गत दर महिन्याच्या ९ तारखेला गरोदर मातांची तपासणी करून उपचार करणे व गर्भातील अर्भकाची काळजी घेत गरोदर मातांच्याही आरोग्याची काळजी घेवून त्यांना वारंवार मार्गदर्शन करण्याचे काम त्या नित्याने करतात़गर्भवती महिलांच्या रक्ताशयात अ‍ॅनिमिया हा आजार आहे का हे ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांच्यावर वेळीच उपचार करत गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखले़माहूर तालुक्यातील वानोळा हा भाग आदिवासी, डोंगराळ, बंजाराबहुल असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावे येत असून १६ हजार ८०० लोकसंख्या आहे़ याच प्रा़आ़ केंद्रांतर्गत चार आरोग्य उपकेंद्र येतात़ त्यांच्या आरोग्याची देखभाल करत आहे, त्या परिस्थितीत आरोग्य सेवा पुरवून जनतेचा आशीर्वाद घेत आहेत़ माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांना १०० टक्के लसीकरण करून ते कसे निरोगी राहतील यावर त्यांचा अधिकार भर असतो़ त्याच्या कार्यावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया वानोळा प्रा़आक़ेंद्राचे वै़अ़ डी़जी़जोगदंड यांनी दिली़गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखलेमाहूर तालुक्यातील वानोळा येथे सध्या कार्यरत असणाºया परिचारिका पीक़े़ भगत यांची २ आॅगस्ट १९८४ ला मांडवी येथे नेमणूक झाली़ त्यानंतर माहूर प्रा़ आ़ केंद्र लोहगाव, आष्टा, सिंदखेड, दहेलीतांडा या ठिकाणी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले़गर्भवती महिलांच्या रक्ताशयात अ‍ॅनिमिया हा आजार आहे का, हे ओळखून वैद्यकीय अधिकाºयांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून त्यांच्यावर वेळीच उपचार करत गरोदर माता व बालमृत्यूला आळाही बसविला़वानोळा हा भाग आदिवासी, डोंगराळ, बंजाराबहुल असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावे येत असून १६ हजार ८०० एवढी लोकसंख्या आहे़

वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना आरोग्य खात्याच्या वरिष्ठांनी व सहकाºयांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने मी माझे कार्य उत्तमपणे पार पाडू शकले़ केवळ मेहनत करून चालणार नाही, त्याला सहकार्याची जोड असली पाहिजे़-पीक़े़भगत, परिचारिका, प्रा़आक़ेंद्र, वानोळा, ता़माहूर

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल