शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वो मिलती हैं... मगर परवडती नही ! मद्यासह तंबाखु, गुटख्याची सर्रासपणे होतेय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:18 IST

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २३ मार्च पासून देश लॉकडाऊन करण्यात आला़ लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तु सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंधन आले. परंतु, बंदबारीतही दारू कुठे उपलब्ध होते ही बाब तळीरामांना चांगलीच माहिती असते़

ठळक मुद्देकिराणा दुकानात मिळतोय गुटखाव्यसन सोडविण्यासाठी चांगला काळ

- श्रीनिवास भोसले नांदेड :  थकवा घालवायाचा म्हणून लागलेली सवय लॉकडाऊन काळात अडचणीची बनत आहे़ सर्वच प्रकारच्या तंबाखू, गुटख्यासह दारूच्या विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे  उपलब्ध होत आहे़ परंतु, शौकिनांना ती चढ्या भावाने परवडत नसल्याने   ‘वो मिलती हैं... मगर परवडती नही!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे़

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २३ मार्च पासून देश लॉकडाऊन करण्यात आला़ लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तु सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंधन आले. परंतु, बंदबारीतही दारू कुठे उपलब्ध होते ही बाब तळीरामांना चांगलीच माहिती असते़ कोणत्याही गावात लग्नकार्य अथवा कोणत्याही निमित्ताने गेल्यानंतर त्यांना दारूंच्या दुकानांचा बरोबर शोध लागतो़ मात्र, यावेळी गावाबाहेर पडणेच अवघड झाल्याने आणि दुकाने बंद असल्याने दररोज दारूचे जुगाड कसे लावायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे़ त्यातही छुप्प्या पद्धतीने दारू उपलब्ध होत आहे़ पण, नियमितपणे चार दोन पैसे जास्तीचे घेवून मद्य विक्री करणारे आज त्यांच्या इच्छेनूसार दर आकारत आहेत़ त्यामुळे तळीरामांची मोठी अडचण निर्माण झाली आहे़

ऐरवी मद्यप्राशन करून आलेला कोणीही मित्रांबरोबर थोडी घेतली, मित्रांनी आग्रह केला म्हणून आज झाली, पार्टी होती नाही म्हणता आलं नाही अशी लाख कारणं सांगतात. पण लॉकडाऊनच्या काळात छुप्या पध्दतीने मिळणाऱ्या मद्याचे दर चौपट वाढले. आपसुकच महागडी दारू पिणे श्रीमंतांनाही आज परवडत नाही़ देशी दारू ५२ ते ५५ रूपयांना मिळणारी आज अडीचशे ते तीनशे रूपयांना मिळत आहे़ तर विदेशी मद्याचेही भाव गगणाला मिळाले़ दिडशे रूपयांत मिळणारे विदेशी मद्य आज पाचशे ते सातशे रूपयांपर्यंत विक्री होत आहे़ त्यामुळे बºयाच तळीरामांनी आपली तलफ भागविण्यासाठी गावठी दारूला पसंती देणे सुरू केल्याने गावठी दारू विक्री करणाºयांचे प्रमाण वाढल्याचे पोलीस कारवाईतून स्पष्ट होत आहे़

किराणा दुकानात मिळतोय गुटखाकाळ्या बाजारात मद्य, सिगरेट, तंबाखु आणि गुटखा यांची छुप्या पध्दतीने विक्री होत आहे. पण याचे दर चांगलेच वाढले आहेत. मद्याच्या ब्रण्डनुसार त्याचे दर ठरवले जात आहेत. मात्र कमीत कमीचा दर हा दोनशे रूपयांचा आहे. तंबाखुच्या एका पुडीने पंचवीस रूपये आकारले जात आहे़  गुटख्याच्या पुढीसाठी चाळीस ते पन्नास रूपये आणि सिगारेट २० रूपयांपासून पुढे विकली जात आहे़ पानटपºया बंद असल्याने ग्रामीण भगाात सर्रासपणे किराणा दुकानांवर प्रतिबंधतिक असलेला गुटखाच काय दारू पण मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़

व्यसन सोडविण्यासाठी चांगला काळलॉकडाऊनचा काळ अनेकांचे व्यवसन सोडविण्यासाठी चांगला आहे़ प्रत्येकजण घरातच असल्याने आणि चोरट्या बाजारात मद्यासह तंबाखू, गुटख्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकजणांना ते परवडणारे नाहीत़ त्यामुळे अनेकजण नको रे बाबा़़़ म्हणून व्यसनाकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्यात मानसिकता सांभाळण्यासाठी अख्ख कुटुंब घरीच असल्याने आधार मिळत आहे़ बरेच जण फोन करून सल्ला मागत आहेत़ योग्य मार्गदर्शनामुळे अनेकांनी आज व्यसन सोडले आहे़ आजच्या वेळेचा सदुपयोग वाचन, गाणी ऐकणे,  योगा, प्राणायाम करणे अशा चांगल्या सवयी लावण्यासाठी अनेकजण करीत आहेत़ - डॉ़शिवानंद बासरे, योग प्रशिक्षक तथा आयुर्वेदाचार्य, नांदेड़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड