शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांत भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:03 IST

वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनांदेड-वर्धा रेल्वेमार्ग : अर्धापूर तालुक्यात भूसंपादनाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वर्धा-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील सात गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली असून ताबाही मिळवला आहे. तालुक्यातील चार गावांतील भूसंपादन प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. जवळपास २५ कोटींहून अधिक रकमेचा मावेजा यासाठी अदा करण्यात येत आहे.नांदेड-वर्धा या प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि हदगाव या दोन तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन केले जात आहे. महसूल विभागाकडून ही प्रक्रिया वेगाने केली जात असली तरी रेल्वे विभागाकडून मात्र महसूल विभागाने संपादित केलेल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणत्याही हालचाली अद्याप सुरू झाल्या नाहीत. यामुळे महसूल विभागाने संपादित केलेली जमीन कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.अर्धापूर तालुक्यातील चिंचवण येथील ०.८० कि.मी. जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासह पार्डी मक्ता येथील २ कि.मी. साठी ७ आर, कारवाडी येथील ६ किमीसाठी २.४६ आर, अमरापूर येथील १.२३ किमीसाठी ६.७२ आर, हमरापूर येथील १.६८ किमीसाठी १०.११ आर, बारसगाव येथे १.५७ किमीसाठी १२.१४ आर आणि लतीफपूर येथील २.२५ किमीसाठी ५.४२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे.या जमिनीसाठी लागणारी संयुक्त मोजणी करण्यात आली आहे. तसेच मावेजा वाटप करुन ताबाही घेण्यात आला आहे.अर्धापूर तालुक्यातील देगाव (बु) येथे २.६७ किमी अंतरासाठी ७.८५ आर, यमशेटवाडी येथे ०.३७ कि.मी. अंतरासाठी २.१९ आर, येळेगाव येथे २३.८९ किमीसाठी ३४.३० आर आणि अर्धापूर येथे ३७.९६ आर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.नांदेड-वर्धा रेल्वे मार्गासाठी अर्धापूर तालुक्यातील ४४.२५ कि.मी. रेल्वे मार्गासाठी ११७.५१ आर जमीन संपादित केली जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेFarmerशेतकरी