शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महामार्ग प्रकरणी नव्याने प्रस्ताव पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:10 IST

अर्धापूर तालुक्यातून जाणा-या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जमीनधारकांना सरसकट मावेजा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शेतक-यांना सरसकट मावेजा मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतक-यांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांची सूचनासरसकट मावेजासाठी प्रयत्न करण्याची शेतक-यांना दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अर्धापूर तालुक्यातून जाणा-या ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील जमीनधारकांना सरसकट मावेजा मिळावा यासाठी प्रशासनाकडून शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर शेतक-यांना सरसकट मावेजा मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतक-यांशी बोलताना दिली.अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, पार्डी, शेणी, चिंचबन, जांभरून, दाभड, बाबापूर, पिंपळगाव यासह अनेक गावांतील शेतकºयांची राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जमीन शासनाकडून संपादित करण्यात येत आहे. ही जमीन संपादित करताना शासनाने जे निकष लावले आहेत़ या निकषासंदर्भात शेतक-यांमध्ये असंतोष असून त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी मंगळवारी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी पार्डी येथे बैठक घेतली. यावेळी आ.डी.पी.सावंत, गणपतराव तिडके, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, किशोर स्वामी आदींची उपस्थिती होती. शासनाने भूसंपादन करताना एकाच शेतक-याच्या जमिनीला १००, ७० आणि ३० टक्के या पद्धतीने मोबदला देत आहे. राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शासनाने केलेल्या भूसंपादित जमिनीच्या १०० टक्के मावेजा मिळावा तसेच सातबारा व होल्डिंग वेगवेगळी असताना एकाच व्यक्तीच्या नावाने नोटीस आल्याने शेतक-यांच्या जमिनीचा मावेजा कमी मिळत आहे.एकाच कुटुंबातील अनेक भाऊ असताना रस्त्यालगतच्या जमिनीचा एकालाच मोबदला मिळत आहे. पार्डी येथील शेतक-यांची जमीन टोलनाक्यासाठी संपादित करण्यात येत आहे. पार्डी या गावातील रस्त्यावरील घरे संपादित करण्यात येत असून घरावर ५० वर्षांपासून ताबा आह़ नमुना नंबर ८ असूनसुद्धा शासन मान्य करीत नसून शेतमालकाच्या नावाने नोटीस काढण्यात आल्या आहेत.त्यासोबतच अर्धापूूर शिवारातील जमिनीला ग्रामीण भागापेक्षा कमी मोबदला देण्यात येत आहे. या सर्व बाबी बाधित शेतकºयांवर अन्याय करणा-या आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी सदाशिव देशमुख, रतन देशमुख, नारायण देशमुख, श्याम मरकुंडे, श्याम तिमेवाड आदी शेतक-यांनी खा.चव्हाण यांच्याकडे केली होती़ यासंदर्भात शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अर्धापूूरसाठी अधिक मावेजा मिळावा यासाठी शासनाकडे आपण प्रयत्न करू, त्यासोबतच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांतील खासदारांशी संपर्क करून सर्वांच्यावतीने सर्वांसाठी एकच मावेजा मिळावा यासाठी दिल्ली येथे जावून केंद्र शासनाशी चर्चा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच अर्धापूूर बायपास संदर्भाने चूक झाली असल्यास त्यात दुरुस्ती करावी अशा सूचना यावेळी खा.चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या शेतक-यांच्या जमिनीचे अवॉड झाले आहेत अशा शेतक-यांनी आपल्या तक्रारी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.जमीन संपादन केलेल्या शेतक-यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही खा़चव्हाण यांनी केली़यावेळी लतिफ, संभाजी साबळे, अब्दुल वाहब, गोविंदराव देशमुख, विठ्ठलराव पतंगे, सुनील कदम, माधवराव कवडे, नरेंद्रसिंग परमार, राजकुमार देशमुख, अनिल साबळे, आनंद कल्याणकर, श्यामसुंदर कल्याणकर, बालासाहेब देशमुख, मधुकरराव देशमुख, नंदकिशोर देशमुख, कैलाश देशमुख, अरुण कल्याणकर, बालासाहेब मदने, पांडुरंग कल्याणकर, प्रकाश देशमुख, मारोती हापगुडे, श्याम मरकुंदेंसह असंख्य शेतकरी उपस्थित होते़मावेजाबाबत शेतक-यांमध्ये असंतोषराष्ट्रीय महामार्ग ३६१ साठी सध्या शासनाकडून भूसंपादन करण्यात येत आहे़ परंतु भूसंपादनातील मावेजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या टप्प्यांमुळे शेतक-यांमध्ये असंतोष आहे़ काही दिवसांपूर्वी याविरोधात हदगाव तालुक्यातील शेतक-यांनी आंदोलन केले होते़ काही जणांनी या प्रकरणात न्यायालयातही धाव घेतली आहे़ भूसंपादनाची जमीन एकच असताना मावेजामध्ये फरक का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे़बैठकीतच महिलेने फोडला टाहो़़़सरस्वतीबाई दोईफोडे या महिलेने खा़ चव्हाण यांच्यासमोर घराची समस्या मांडली़ त्या म्हणाल्या, आमची तिसरी पिढी या जागेवर राहत़े़ हे घर आमच्या सास-याच्या वडिलांनी घेतले होते़े त्यावेळेस १०० रुपयांच्या बाँड पेपरवर झालेल्या व्यवहाराची प्रत आमच्याजवळ आहे, परंतु सातबा-यावर आमचे नाव नसल्याने आमच्या जमिनीचे पैसे देण्यास नकार देण्यात येत आहे़ हा आमच्यावर अन्यायच असल्याचा टाहो त्या महिलेने फोडला़