शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसडीआरएफ’ला मराठवाड्याचे वावडे, एकाही जिल्ह्यात नाही पूर्णवेळ पथक

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 14, 2024 09:32 IST

SDRF: राज्य आपत्ती निवारण बलाची (एसडीआरएफ) स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. 

- प्रसाद आर्वीकरनांदेड - राज्य आपत्ती निवारण बलाची (एसडीआरएफ) स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल (एसडीआरएफ) कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ  कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

मदतीसाठी लागतात७ ते १० तास पावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुण्यातून येण्यासाठी १० तास लागतात.  

पुरातून वाचविले होते... - मागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते.- परभणीतील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढले.

राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्र मुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे.मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत होऊ शकते. 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा