शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:02 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मनुला, माटाळा (ता. हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशात आजही शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील मनुला बु़ येथे जिल्हा परिषदेची ५ वी तर माटाळा येथे ४ थी पर्यंत शाळा आहे़  येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते़ कधी नदीला पाणी वाढलेच तर मात्र शाळेतच मुक्काम करण्याची वेळ येते़.

- रामेश्वर बोरकरनिवघा बाजार (नांदेड) : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या मनुला, माटाळा (ता़ हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते़ या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना कधी गुडघाभर तर कधी कंबरेएवढ्या पाण्यातूनच शाळेचा मार्ग काढावा लागतो़ त्यात कधी नदीला पाणी वाढलेच तर मात्र शाळेतच मुक्काम करण्याची वेळ येते़.

हदगाव तालुक्यातील मनुला बु़ येथे जिल्हा परिषदेची ५ वी तर माटाळा येथे ४ थी पर्यंत शाळा आहे़  त्यामुळे या दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हदगाव किंवा विदर्भाच्या उमरखेड तालुक्यातील पळशी येथे जाण्याशिवाय पर्याय नाही़ त्यात या दोन्ही गावांतील जवळपास शंभरावर विद्यार्थ्यांनी पळशी येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतले आहेत़  मनुला, माटाळा ते पळशी हे अंतर जवळपास दीड किमीचे आहे़ तर रस्ता मार्गाने पळशी गाठावयाचे असल्यास मनुला येथील नागरिकांना २५ किमीचे अंतर कापून हदगावला यावे लागते़ त्यानंतर हदगाव येथून जवळपास पाच ते सहा किमी पळशी गावचे अंतर आहे़ त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी नदीपात्रातूनच पळशी गाठतात़

यापूर्वी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी उसाचे ट्रक ये-जा करीत़ त्यासाठी नदीवर छोटा पूल उभारण्यात आला होता़ परंतु, यंदा पावसामुळे हा पूलही वाहून गेला़ या पुलावरुनच यापूर्वी विद्यार्थी शाळेत जात होते़ यंदा पूलच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नदीपात्रातील कंबरेएवढ्या पाण्यातूनच पळशी येथील शाळा गाठावी लागते़ नदीचे पाणी वाढल्यावर मात्र विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागते़ शिक्षणासाठी दररोज विद्यार्थ्यांचा असा जीवघेणा प्रवास सुरु आहे़ त्यामुळे सकाळी शाळेत गेलेला पाल्य सायंकाळी सुरक्षित परतेल का? या चिंतेत येथील पालक आहेत़ 

शाळेतच करावा लागतो मुक्कामसकाळी नदीपात्र ओलांडून शाळेत विद्यार्थी गेले अन् त्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास मात्र विद्यार्थ्यांना शाळेतच मुक्काम करावा लागतो़ शाळेचे शिक्षकच या मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करतात़ तर काही मुलांचे नातेवाईक पळशी येथे आहेत़ त्या नातेवाईकांच्या घरी ही मुले थांबतात़  अशी प्रतिक्रिया देवबा बनसोडे या पालकाने दिली़

दररोज एका पालकाकडे जबाबदारीनदीपात्रातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित नदीपात्र ओलांडून देण्यासाठी दररोज एका पालकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे़ एकमेकांत समन्वयाद्वारे हे पालक मुलांना नदीपात्र ओलांडून देतात़, अशी माहिती अप्पाराव खराटे यांनी दिली़ 

नावही झाली गायबयापूर्वी नदीपात्र ओलांडण्यासाठी या ठिकाणी नाव होती़ नदीपात्राचे पाणी वाढल्यानंतर अनेकजण नावेद्वारे पळशी गाव गाठत होते़ परंतु, यंदा नावेची व्यवस्थाही या ठिकाणी नाही़ त्यात अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे नदीपात्रात पाणी कमी दिसत असले तरी ते ओलांडताना विशेष खबरदारी घ्यावी लागत असल्याचे कैैलास जाधव, कमलाबाई जाधव, शांताबाई लामटिळे या पालकांनी सांगितले़ 

किमान बोटची व्यवस्था करावी याबाबत विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार पेंदे म्हणाले़, नदीपात्रात पाणी वाढल्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबून ठेवावे लागते़ दररोज जवळपास ९० मुले नदीच्या पाण्यातूनच शाळेत येतात़ अनेकवेळा त्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होतो़ उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात बुडून एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यूही झाला होता़ याबाबत नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़ या ठिकाणी किमान एका बोटची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ - 

 

टॅग्स :Nanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र