शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार; विद्यार्थी वाऱ्यावर, बिलोली तालुक्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 6:47 AM

 बिलोली  तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़

नांदेड -  बिलोली  तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़तालुक्यात बिलोली, बिजूर व कुंडलवाडी येथे लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या पहिली ते आठवी अशा तीन शाळा चालतात़ प्रारंभी दोन वर्षे प्रगतीकडे घोडदौड करणाºया शाळेतील शिक्षकांचे व संस्थाचालकांचे बिनसले़ आर्थिक देवाणघेवाण, पगारातून परस्पर कपात आदी वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या़ जिल्हा परिषदेसमोर सामूहिक उपोषणही केले़ मागच्या सहा महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या़ अशा परिस्थितीमुळे अशोक विद्यालय कुंडलवाडी येथील ३०० विद्यार्थ्यांनी एकाच पंधरवड्यात शाळा सोडली़ बिलोलीतील सत्यसाई विद्यालयातही असाच प्रकार झाला़ शिक्षक व संस्थाचालकांचे बिनसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालकही सैरावैरा झाले़ जून-जुलैच्या महिन्यात प्रवेश प्रक्रिया असताना विद्यार्थी शाळा सोडून गेले़ शुक्रवारी एकाही शाळेत शिक्षक आले नाहीत. सर्व वर्गांची मुले एकत्रित करून शाळा सुरू ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली़ याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार आल्यानंतर बिलोली गट शिक्षणाधिकाºयांनी विस्तार अधिकारी डी़व्ही़धुळशट्टे यांना पाठवून रितसर चौकशी केली़ शाळेवर शिक्षकच नसल्याने चिमुकले विद्यार्थी कार्यालयासमोर एकत्रित जमा झालेले त्यांना दिसले.पूर्वसूचना न देता गैरहजरपालकांच्या तक्रारीनंतर शाळेची पाहणी करून चौकशी केली व शासन दरबारी कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व शिक्षक गैरहजर आहेत, असा अभिप्राय नोंदवून वरिष्ठांना कळवले.- डी.व्ही. धुळशेट्टे, विस्तार अधिकारी, बिलोली याआधीही असेच घडले होते१३ जुलै रोजी तीनही शाळेतील मुख्याध्यापक वगळता सर्व २४ शिक्षक कोणतीही रजा अथवा पूर्वसूचना न देता गैरहजर झाले़ यापूर्वी सुद्धा अशीच आंदोलनाची भूमिका शिक्षकांनी घेतली होती.- संदीप गायकवाड, मुख्याध्यापक पालकांनाच धमक्याशाळेत येणाºया विद्यार्थ्यांना अथवा प्रवेश घेणाºया पालकांना हे शिक्षक पिटाळून लावतात़ शाळा बंद होणार असे सांगतात़ येथे आता कोणीही शिकवत नाही़ शाळेत विद्यार्थ्याला नाव घालू नका अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या जातात.- बाळासाहेब राचुरे, संस्था सचिव, बिलोली शिक्षण विभागाकडून संस्थेच्या तीनही शाळांची चौकशी सुरू आहे.- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प.नांदेड

टॅग्स :educationशैक्षणिकNandedनांदेड