शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शाळेचे दरवाजे बंदच; पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:20 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक निर्णयाला महत्व दिले आहे.

ठळक मुद्दे शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आहे जिल्ह्यातील एकाही गावातील शाळा सुरू झाली नाही.

नांदेड : राज्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्वाचा असल्याने नांदेड  जिल्ह्यातील एकही शाळा अद्याप सुरू करण्यात आली नाही. असे असले तरी शिक्षकांची मात्र ५० टक्के   उपस्थिती आहे. 

कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक निर्णयाला महत्व दिले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतची एकही शाळा अद्याप सुरू झाली नाही. १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली असल्याने सध्या शिक्षण विभागाकडून पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात येत आहे. दरम्यान, दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची आकडे वाढत असल्याने पालकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास अनेक पालकांनी नकार दर्शविला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून दोन वेळेस प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कोरोना महामारी आटोक्यात येत नसल्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत होतो.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची आकडेवारी घसरली होती. दिवाळीनंतर मात्र रूग्णांची आकडेवारीचा आलेख चढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी काही शिक्षकांना कोरोनाच संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. तर काही शिक्षकांचे रिपोर्ट उशीरा प्राप्त होत होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शाळेतील ५० टक्के  शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत थांबावे लागत आहे.

पालकांकडून संमतीपत्र२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. आता १ डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याची शक्यता असून त्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेतले जात आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील एकाही गावातील शाळा सुरू झाली नाही.  शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात  तयारी केली होती. शिक्षकांची कोविड १९ टेस्ट करण्यात  येत आहे. मात्र स्थानिक पातळीवर शाळा सुरू न करण्यासंदर्भात निर्णय झाला असून १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होतील. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाNandedनांदेडEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या