शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:07 IST

दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़

ठळक मुद्देपित्याने केली होती आत्महत्या साईप्रसादच्या दात्यांनी दिले संसारोपयोगी साहित्य

नांदेड : दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ भवर यांच्या मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी साईप्रसादच्या दात्यांनी घेतली असून लग्नासाठीचे सर्व साहित्य भवर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़ साईप्रसादच्या या दातृत्वाचे हट्टा गावात कौतुक होत आहे़वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी नानासाहेब भवर यांनी मुलगी मनीषा हिची सोयरीक जुळविली होती़ ७ मे लग्नाची तारीखही ठरली होती़ परंतु सोयरीक झाल्यानंतर मनीषाच्या विवाहासाठी लागणारा खर्च कसा करायचा, या विवंचनेत ते होते़ भवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच़ २० गुंठे जमीन असून भवर कुटुंब रोजमजुरी करुनच आपला उदरनिर्वाह चालवितात़परंतु लग्नासाठीचा खर्च जुळविताना नानासाहेब भवर हतबल झाले होते़ त्याच विंवचनेत त्यांनी २८ एप्रिल रोजी आत्महत्या केली़ त्यामुळे अगोदरच संकटात असलेले भवर कुटुंब घरातील कर्तापुरुष गेल्याने अधिकच खचले होते़ भवर कुटुंबियावर कोसळलेल्या या संकटाची माहिती साईप्रसादच्या दात्यांना कळाली़त्यांनी लगेच भवर कुटुंबियांशी संपर्क साधून मनीषाच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलणार असल्याचे कळविले़ त्यानंतर साईप्रसादच्या दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले़ आठ दिवसांतच मनीषाच्या लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य, वधू-वरांचे कपडे, मंगळसूत्र यासह संसारोपयोगी साहित्याचा साईप्रसादकडे ओघ सुरु झाला़ काही दिवसांत साईप्रसादकडे लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य जमा झाले होते़ शुक्रवारी साईप्रसादने हे सर्व साहित्य भवर कुटुंबियाकडे सुपूर्द केले़ साईप्रसादच्या या दातृत्वामुळे भवर कुटुंबियांनी आनंदाश्रू गाळत मनोमन आभार मानले़आत्महत्या करु नका, साईप्रसादशी संपर्क साधावडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींच्या विवाहासाठी संकटात असलेल्यांनी साईप्रसादशी संपर्क साधावा़ साईप्रसाद अशा मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार आहे़ तसेच विवाहाच्या चिंतेमुळे आत्महत्या करु नका असे आवाहनही साईप्रसादने केले आहे़आजपर्यंत साईप्रसादने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनेक मुलींचे विवाह लावून दिले आहेत़ त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच ६१ जोडप्यांचा विवाह सोहळाही घेण्यात आला होता़

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक