शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरआरसीपूर्वीच स्वारातीम विद्यापीठाला कोसवर्कची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:28 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएच़ डी़ साठी विद्यापीठाकडून संशोधक विद्यार्थ्यांकडून कोर्सवर्क बंधनकारक केले आहे़ मात्र यावर्षी आरआरसी होण्यापूर्वीच विद्यापीठाने कोर्सवर्कची घाई केल्याने नवीन पीएच़ डी़ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे़

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठ : पीएच़ डी़ संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएच़ डी़ साठी विद्यापीठाकडून संशोधक विद्यार्थ्यांकडून कोर्सवर्क बंधनकारक केले आहे़ मात्र यावर्षी आरआरसी होण्यापूर्वीच विद्यापीठाने कोर्सवर्कची घाई केल्याने नवीन पीएच़ डी़ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे़यावर्षी पीएच़ डी़ पदवीसाठी प्रवेशपूर्व परीक्षा पास झालेले सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांना आरआरसी (रिसर्च रिकग्नीकेशन कमिटी) कडून विषयाला मंजुरी झाली नाही़ शिवाय प्रवेशाची पात्रता झाली नसताना विद्यापीठाकडून कोर्सवर्कची घाई का केली जात आहे, असा प्रश्न पीएच़ डी़ करणा-या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे़ संशोधन विषयाला मान्यताच नसताना अगोदर कोर्सवर्क हे वरातीमागून घोडे असल्याचा प्रकार विद्यापीठाकडून केला जात असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत आहे़विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नोटीफिकेशन ११ जुलै २००९ पासून जे विद्यार्थी पीएच़ डी़ पदवी संपादन करणार आहेत़ अशा विद्यार्थ्यांना कोर्सवर्क लागू करण्यात आला आहे़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात यावर्षी पीएच़ डी़ प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरएसी (रिसर्च अ‍ॅलोकेशन कमिटी) घेण्यात आली़ या समितीकडून विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात आले़ प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण व सूट मिमळालेल्या विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शकाकडून १५ दिवसांत बहृत आराखडा तयार करून तो विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात सादर करण्यास सांगण्यात आले़ हा बह्रत आराखडा विद्यापीठाला सादर झाल्यानंतर १५ दिवसांनी आरआरसी ही संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन आराखड्यास मंजुरी देते़ विषयात बदल करणे, विषय पुनर्रावृत्त झाला असेल तर त्यात दुरूस्ती करण्यास सांगितले जाते़ बदल झाल्यास तो बह्रत आराखडा विद्यापीठाला पुन्हा सादर केला जातो़ व विषय मान्यता दिली जाते़ त्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांना एका महिन्यानंतर विषय मान्यतापत्र दिले जाते़ परंतु स्वारातीम विद्यापीठाने यावर्षी पीएच़ डी़ करणा-या विद्यार्थ्यांचे आरएसी होवून काहीच दिवस झाले असताना व संशोधक मार्गदर्शकाकडून प्रबंधाचा विषयही पूर्ण झाला नसताना कोर्सवर्कची घाई केली़ पीएच़ डी़ ही पदवी पाच वर्षांत पूर्ण करायची असते़ याशिवाय पुढील दोन वर्षे वाढीव मुदतही मिळते़ म्हणजेच सात वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना कोर्सवर्कची कधीही पूर्ण करता येते़ परंतु विद्यापीठाने मात्र पीएच़ डी़ करणाºया विद्यार्थ्यांच्या विषयाची अंतिम मंजुरी झाली नाही़ आरआरसी झाली नाही, त्याची पीएच़ डी़ प्रवेशासाठी पात्रताच झाली नाही़ तर कोर्सवर्क कशाच्या आधारावर करायचा, हे नियमाच्या विरोधात असल्याचे संशोधक विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे़

नव्याने पीएच़ डी़ प्रवेश करणा-या विद्यार्थ्यांना अगोदर संशोधनाचा विषय मंजूर व्हावा लागतो़ त्यानंतर त्याचा प्रवेश पात्रता या प्रक्रियेतून जावे लागते़ केवळ रिसर्च अ‍ॅलोकेशन कमिटी झाल्यानंतर लगेच कोर्सवर्क व त्याची परीक्षा विद्यापीठाने घेणे नियमबाह्य आहे़- प्रा़ डॉ़ राजपालसिंह चिखलीकर, संशोधक मार्गदर्शक

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडResearchसंशोधनEducationशिक्षण