महापालिकेच्या आर्थिक चाव्यासाठी रस्सीखेच; ‘स्थायी’त प्रवेशासाठी दिग्गजांचे पुन्हा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:46 PM2020-12-04T18:46:42+5:302020-12-04T18:47:57+5:30

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ  १ डिसेंबर रोजी संपला आहे.

Rope for the financial bite of the corporation; Veterans retry for ‘permanent’ entry | महापालिकेच्या आर्थिक चाव्यासाठी रस्सीखेच; ‘स्थायी’त प्रवेशासाठी दिग्गजांचे पुन्हा प्रयत्न 

महापालिकेच्या आर्थिक चाव्यासाठी रस्सीखेच; ‘स्थायी’त प्रवेशासाठी दिग्गजांचे पुन्हा प्रयत्न 

googlenewsNext
ठळक मुद्देआगामी सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची निवडकोरोना संकटात गेला स्थायी समितीचा  कार्यकाळ

नांदेड : महापालिकेच्या आर्थिक चाव्या असणाऱ्या स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी काँग्रेसमधील दिग्गज पुन्हा एकदा सक्रीय झाले असून स्थायीतील प्रवेशानंतर सभापती पदावर या दिग्गजांचा निशाणा राहणार आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ  १ डिसेंबर रोजी संपला आहे. त्यामध्ये दयानंद वाघमारे, पुजा पवळे, अ. रशीद अ. गणी, फारुख हुसेन, ज्योती कल्याणकर, श्रीनिवास जाधव, राजेश यन्नम आणि करुणा कोकाटे यांचा समावेश आहे.  या सदस्यांच्या कालावधीसह विद्यमान सभापती अमित तेहरा यांचा सभापती पदाचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे सदस्य निवडीनंतर सभापती पदाचीही निवड होणार आहे.   स्थायी समितीचे सदस्यत्व मिळण्यासाठी इच्छुक हे नेत्यांकडे साकडे घालत आहेत. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील ८ सदस्यांची नावे घोषित होणार आहेत. हे सर्व सदस्य काँग्रेसचे राहणारा आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील बंद लिफाफ्यात आपले नाव यावे याबाबत प्रयत्न केले जात आहेत. 

स्थायी समितीत प्रवेश मिळाल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. सभापती पदासाठी माजी सभापती किशोर स्वामी, प्रशांत तिडके हे इच्छुक आहेत तर विद्यमान सभापती अमितसिंह तेहरा हेही आपल्या कोरोना काळात काम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा संधी मिळावी यासाठी आग्रही आहेत. सदस्य पदासाठी नगरसेविका संगीता डक, महेंद्र पिंपळे, गीतांजली हटकर, कौशल्य पुरी, ज्योती कदम, फरहत सुलताना जहागीरदार, रिहाना बेगम चाँद कुरेशी, सुनंदा पाटील यांची नावे सदस्य पदासाठी पुढे येत आहेत. 

स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची निवड विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे   १ डिसेंबरपूर्वी होणे गरजेचे होते. मात्र सर्वसाधारण सभा झाली नसल्याने ही निवड करता आली नाही. आचारसंहितेचे कारण देत सभा झाली नसली तरीही यापूर्वी आचारसंहिता कालावधीत सदस्य निवडीसाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र कार्यकाळ संपल्यानंतर सदस्यांची निवड होत आहे. ही उल्लेखनीय बाब आहे. आगामी सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे. 

कोरोना संकटात गेला स्थायी समितीचा  कार्यकाळ
  जानेवारी २०१९ मध्ये सभापतीपदी अमितसिंह तेहरा यांची निवड झाली होती. निवड होताच तत्कालीन आयुक्त लहुराज माळी हे रजेवर गेले. त्यानंतर एप्रिलमध्ये विद्यमान आयुक्त डॉ. सुनील लहाने हे रुजू झाले. मात्र मार्चपासूनच कोरोना संकट सुरू झाल्याने स्थायी समितीला काम करण्यात अनेक अडचणी आल्या. आरोग्य याच विषयाला प्राधान्य दिल्याने इतर संकल्पीत योजना मात्र राबवता आल्या नाहीत. 

Web Title: Rope for the financial bite of the corporation; Veterans retry for ‘permanent’ entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.