शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे जामिनावर सुटलेला दरोडेखोर पुन्हा सक्रीय; नांदेडमध्ये भरदिवसा लुटले १५ तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:46 IST

दरोड्याच्या या घटनेतील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वीच अमरावती येथील तुरुंगातून जामिनावर सुटला आहे.

ठळक मुद्देभरदिवसा दुकानमालकावर खंजिराने प्राणघातक हल्ला

नांदेड : शहरातील दत्तनगर भागात असलेल्या एका सराफा दुकानात दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांनी बुधवारी दुकानमालकावर खंजीरने प्राणघातक हल्ला करीत १५ तोळे सोने लुटले. भरदिवसा मुख्य वस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ दरोडेखोरांना अनेकांनी पाहिले असून, यापूर्वीही ते या परिसरात आले होते, अशी माहिती रहिवाशांनी दिली़

दत्तनगर येथील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाच्या सराफा दुकानात बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन तिघे जण आले़ त्यांनी दुकानाचे शटर आतून बंद केले़ यावेळी दुकानमालक मुक्तेश्वर शहाणे यांनी विरोध केला असता, त्यांच्यावर खंजीरने हल्ला करण्यात आला़ तसेच दुकानातील १५ तोळे सोने काढून घेतले़ दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकालाही खंजीरचा धाक दाखवून त्याच्याजवळील २५ हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर काही मिनिटांतच दरोडेखोरांनी दुचाकीवरुन पोबारा केला़ जखमी झालेले शहाणे बाहेर येवून आरडाओरड करेपर्यंत दरोडेखोर नजरेआड गेले होते़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मुख्य आरोपी होता जामिनावरदरोड्याच्या या घटनेतील मुख्य आरोपी हा काही दिवसांपूर्वीच अमरावती येथील तुरुंगातून जामिनावर सुटला होता़ कोरोनाच्या संकटामुळे त्याला सोडण्यात आले होते़ त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकला़ विशेष म्हणजे, या दोन साथीदारातील एकाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केला होता़  

टॅग्स :NandedनांदेडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी