शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

उमरी तालुक्यात वाळू माफियांविरुद्ध महसूलची धडक कारवाई; चार टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:44 IST

 महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.

उमरी (नांदेड ) :  महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. बळेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे जमा केलेली वाळू व अवैधरित्या वाळू वाहतूक करताना चार टिप्पर पकडण्यात आले. 

परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड  यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेश लांडगे , जी.एस.  कोतलगावकर , मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, एस. बी.  बाचीपल्ले, तलाठी सोन्नर, हराळ, जाधव, कोतवाल दिलीप यमेवार , राठोड आदींचा या कारवाईत सहभाग होता. 

बळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून  गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी  महसूल विभागाला प्राप्त झाल्या  होत्या. यावरून आज पहाटे पाच वाजता पासून बळेगाव येथील गोदावरी नदीपात्राशेजारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. अचानक धाडी टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले.

महसूल विभागाने पकडलेल्या  टिपरचे क्रमांक एमएच- २६ - बीई ,  एमएच - २६ एडी- ३०५५ , एमएच - २० वाय - ८३४१, एमएच - १६ - जी - ६५७९ याप्रमाणे आहेत. सदर वाहनांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल अशी माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी