शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदारांची शिवसेनेत घरवापसी; सुभाष वानखेडेंच्या प्रवेशानंतर शिवसैनिकांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:18 IST

शिवसेनेकडून तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घर वापसी झाली.

हदगाव ( नांदेड) : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेकडून तीन वेळा आमदार व एक वेळा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घर वापसी झाली. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वानखेडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधले. यामुळे हदगाव येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.

शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिलेदारांना एकत्र करण्याचे सत्र सुरू केले आहे. खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचे पडसाद उमटत आहेत. तर इकडे वानखेडे यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले. नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सुभाष वानखेडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत होणारी मोठी होणारी फुट टाळता येईल अशी पक्षाला आशा आहे.

वानखेडे यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये व नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्ययालयाचे दिसून येत आहे . यावेळी मातोश्रीवर नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , भुजंग पाटील , माधवराव पावडे , धोंडू पाटील , आष्टीकर भुजंग पाटील माधवराव पावडे , धोंडू पाटील , जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे , उमेश मुंडे , आनंदा बोंढारे सह अनेक शिवसेना पदाधिका - यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रवेशाचा हदगांव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्यामराव चव्हाण , युवासेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर , युवा नेते भास्करदादा वानखेडे , हदगांव सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव पाटील , कडवट शिवसैनिक प्रकाशराव जाधव , दत्तरामजी जाधव , विद्यानंद जाधव , अवधूत देवसरकर , दिपक मुधोळकर आदींनी वानखेडे यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. 

असा आहे वानखेडे यांचा राजकीय प्रवासमाजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या घरवापसीमुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे . हिंगोली लोकसभेत पराभव झाल्यानंतर वानखेडे हे नाराज होऊन अगोदर भाजपमध्ये आणि नंतर हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले होते. हदगाव विधानसभेच्या 1995, 1999 व 2004 अशा तिन्ही निवडणुकीत  शिवसेनेकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याचे पक्षप्रतोद म्हणूनही त्यांच्यावर शिवसेनेने जबाबदारी टाकली होती. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून ते निवडून आले. तर 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व पुढाऱ्यांनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी देऊ नये असा त्यांचा आग्रह होता. 

मात्र, वानखेडे यांची समजूत काढण्यासाठी त्यांना शिवसेनेने 2014 साली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी बहाल केली होती. परंतु त्यांनी शिवसेनेचा बी फॉर्म परत देऊन ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात सेनेने तत्कालीन जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. आपल्याला पराभूत करणाऱ्या वसमत आणि कळमनुरीच्या माजी आमदारांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार सुभाष वानखेडे नाराज होऊन त्यांनी भाजपची वाट धरली आणि सेनेच्या पुढाऱ्यावर कडव्या शब्दात टीका केली. त्यानंतर मधल्या काळात अनेकदा त्यांच्या घर वापसीचे प्रयत्न झाले . परंतु स्थानिक पुढाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यात यश येऊ शकले नाही. 

मुंबईतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी वानखेडे यांचे सलोख्याचे संबंध होते . परंतु पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाराज करता येत नसल्याने वानखेडे यांच्यासाठी शिवसेनेत त्यावेळी अनुकूल वातावरण नव्हते . 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा काही पदाधिकाऱ्यांकडून वानखेडे यांना दिली. परंतु ऐनवेळी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे चिडलेल्या वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हिंगोलीची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. भाजपा असो की काँग्रेस सुभाष वानखेडे यांचे पण कुठेही जमले नाही. केवळ कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची औपचारिकता ते पार पाडत होते. त्यांचे मन शिवसेनेतच रमले होते . परंतु, काही जणांनी त्यांच्या परतीचे दोर कापल्यामुळे त्यांनीही शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अधिक रस दाखला नव्हता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNandedनांदेड