नांदेड : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे १६-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध करण्यात आले आहे.या मतमोजणीच्या अनुषंगाने कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय इतर कुणीही प्रवेश करणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ५ प्रवेशद्वाराजवळ विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार नारायणराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या समोर येथून नियुक्त अधिकारी,उमेदवार यांच्याशिवाय इतर कुणाचेही वाहन प्रवेश करणार नाही. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना माधव दालमीलकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे व त्यांच्या वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नवामोंढा येथे पार्कींगची व्यवस्था केली आहे. सर्व वाहने वाहनतळावर लावूनच सर्वांनी प्रवेश घ्यावा. रहदारीस अडथळा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी डोंगरे यांच्यासह निवडणूक निरीक्षक हरदीपसिंघ आणि मतमोजणी निरीक्षक सुरेशचंद्र गुप्ता यांनी मतमोजणी केंद्र परिसराची पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी कर्मचारीही उपस्थित होते.
मतमोजणी केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:46 IST
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्याकरिता प्रतिबंध करण्यात आले आहे.
मतमोजणी केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर प्रतिबंध
ठळक मुद्देमतमोजणी। ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही