शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ४९ लाखांच्या कामांचा बिलोली नगरपालिकेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:26 IST

बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत.

बिलोली : बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षेखाली विशेष सभा घेण्यात आली असून शहरात २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची कामे होणार आहेत. यावेळी मुख्याधिकारी टी.डी.कांंबळे, उपाध्यक्ष मारोती पटाईत यांची प्रमुख उपस्थिती होती.बिलोली शहरात अनेक दिवसांपासून नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मागणी असलेल्या गांधीनगर भागातील रस्ते बांधकामाच्या निविदेबाबतच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ईदगाह गल्लीतील कत्तलखाना मार्गाकडील रस्ते व नाली बांधकामासाठीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. शासन नियमानुसार जादा दराची निविदा देणे हे पालिकेच्या हिताचे नसून ऐनवेळी दोन कमी बोलीच्या निविदाधारकांनी माघार घेऊन परस्पर संगनमत केल्याने पालिकेला आर्थिक भूर्दंड बसू नये व फेरनिविदा काढण्याविषयी अनुप अंकुशकर यांनी आक्षेप घेतला. तर उपस्थित १३ नगरसेवकांपैकी काँग्रेस, शहर आघाडी व अपक्ष अशा १२ नगरसेवकांनी विशेष निधीतील कामांना तात्काळ मंजुरी देवून कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी सभागृहाला केली.१२ नगरसेवकांसह माजी नगराध्यक्ष रणवीरसिंह चौहान, शंकरराव अंकुशकर, ए. जी. कुरेशी यांच्यासह अनेकांनी कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.या सभेला नगरसेविका राधा पटाईत, महानंदा देशमुख, अनुजा शंखपाळे, मैमुना बेगम अमजत चाऊस, नगरसेवक अरुण उप्पलवार, लक्ष्मण शेट्टीवार, शाहेदबेग ईनामदार, जावेद कुरेशी, आघाडीचे विरोधी पक्षनेते अनुप अंकुशकर, प्रकाश पोवाडे, चंद्रकलाबाई चंचलवाड व अपक्ष नगरसेविका गोदावरीबाई पुप्पलवार यांची उपस्थिती तर काँग्रेसचे तीन व आघाडीच्या एक नगरसेविकेची अनुपस्थिती होती.

विशेष सभेत २ कोटी ४९ लाखांच्या विविध कामांच्या निविदा प्राप्त झाल्या. न.प.प्रशासनाकडून निविदांचा तुलनात्मक तक्ता सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. सभागृहातील उपस्थित १३ नगरसेवकांपैकी १२ जणांंनी विकासकामे तात्काळ होण्यासंदर्भात संमती दर्शविल्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यात येईल - त्र्यंबक कांबळे, मुख्याधिकारी न.प.बिलोली़

टॅग्स :Nandedनांदेडnagaradhyakshaनगराध्यक्षfundsनिधी