शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

दोरीच्या शिडीने काही वानरे पुराच्याबाहेर, काहींची तगमग; मन्याड नदीत रेस्क्यू मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 14:54 IST

दोन आठवड्यापासून अडकलेल्या २२ वानरांसाठी शुक्रवारी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली आहे

- मारोती चिलपिपरेकंधार ( नांदेड) : माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला असून तालुक्यातील बहाद्दरपुरा गावाजवळील मन्याड नदी पात्रात पाण्यात झाडावर दोन आठवड्यापासून अडकलेल्या २२ वानरांसाठी शुक्रवारी ( दि. १३ ) एसडीआरएफ जवानांच्या टीमकडून व वन विभागाकडून दिवसभर रेस्क्यू मोहीम राबवून त्यांच्या सुटकेसाठी दोरीच्या साह्याने शिडी तयार करून ठेवण्यात आली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी राज्यभर सर्वत्र धो-धो पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसाचा कहर कंधार तालुक्यातही पहायला मिळाला. माणसांप्रमाणेच प्रमाणेच प्राण्यांना देखील पुराचा फटका बसला आहे. तालुक्यातील मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या पाण्यामध्ये २० ते २२ वानर अडकले होते. याची माहिती नागरिकांनी वन विभाग प्रशासनाला दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व जंगमवाडी गावातील सरपंच व काही नागरिक  वानरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यापासून नदी पात्राचा किनारा ३०० मीटर अंतरावर असल्यामुळे वन विभागानी केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त होत नव्हते.भूकेलेल्या वानरांसाठी अन्नपदार्थ, केळी आणि फळांची व्यवस्था देखील या वन विभागाकडून रोज करण्यात येत होती. 

दोरीची शिडी लावली अखेर धुळे येथून एसडीआरएफ जवानांच्या टीमला बोलवण्यात आले. शुक्रवारी ( दि. १३) या टीमने वन विभागाच्या मदतीने रेस्क्यू मोहीम सुरू केली. वानरांचा कळप अडकलेल्या झाडापासून नदीपात्राच्या किनाऱ्यापर्यंत दोरीची शिडी लावण्यात आली आहे. तसेच वानरांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरता कॅमेरे बसवण्यात आले होते. शुक्रवारी टोळीतील काही वानरे शिडीच्या साह्याने नदीपात्राच्या बाहेर आले असल्याची माहिती वन खात्याकडून मिळाली. 

हे राबवत आहेत रेस्क्यू मोहीमकेशव वाबळे उपवनसंरक्षक, भिमसिंगजी ठाकूर सहाय्यक वनसंरक्षक नांदेड व सागर हराळ वनपरिक्षेत्र अधिकारी मुखेड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र मुखेड, वनपरिमंडळ कंधार, जंगमवाडी गावचे सरपंच व नागरिक आणि एसडीआरएफ जवानाच्या टिमसह अतिंद्र कट्टी मानद वन्यजीव रक्षक नांदेड, शंकर धोंडगे वनपरिमंडळ कंधार, शिवसांब घोडके वनरक्षक लिंबोटी, खय्यूम शेख वनरक्षक बामणी, नागरगोजे वनरक्षक आंबुलगा तसेच इतर वनकर्मचारी वानरांना अडकलेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी मेहनत घेत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडMonkeyमाकडfloodपूर