शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकादेवी घाटात भाविकांचे वाहन कठड्यास धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:29 IST

दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्दे१७ भाविक जखमीदोघांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले

श्रीक्षेत्र माहूर : दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातल्या कोर्टा येथील भाविक दर महिन्याला माहूरगडावरील देवस्थानावर दर्शन घेण्यासाठी येत असतात़ नेहमीप्रमाणे ६ मार्च रोजी सकाळी क्रूझर या खाजगी वाहनाने (क्र. एम़ एच. २२ डी़२१९८) १२ वाजताच्या सुमारास माहूरगडावरील सर्व देवस्थानचे दर्शन घेऊन पांडवलेणी येथे दर्शनासाठी जात असताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटात दुसऱ्या घातक वळणावर क्रूझर गाडी गेली. येथे चालक-मालक संदीप बर्गे (वय २२ रा़ एकंबा, ता़उमरखेड) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन संरक्षक भिंतीवर जाऊन धडकले़ यात सखाराम तेलेवाड (६५), धोंडिबा कºहाळे (६५), विलास बुरकुले (४०), तुकाराम देवताळे (४०), ममता मेंडके (३०), शेषाबाई शेळके (६०), दगडाबाई शेळके (६०), पुण्यरथा खराटे (३५), सुरेखा खराटे (२०), रामराव खराटे (२०), पायल खुडे (८), कुसुम बुरकुले (६०), वत्सलाबाई खंदारे (६०), अनूसया डोकाळे (५५), राहुल खंदारे (१२), कार्तिक शेळके (८), गौरव बुरकुले (५) हे गंभीर जखमी झाले आहेत़घटना कळताच रेणुकादेवी संस्थानच्या रूग्णवाहिकाचे चालक विनोद जाधव, सुरक्षारक्षक इंद्रजिीत राठोड, गजानन घुगे यांच्यासह कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जमखींना माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे डॉ़व्ही़एऩभोसले, डॉ़विजय मोरे, डॉ़ प्रसन्न भबुतकर, डॉ़निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून दोन गंभीर जखमीस पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले़

टॅग्स :Nandedनांदेडroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात