शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेत घेऊन नातेवाईकांचा आठ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:45 IST

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली.

ठळक मुद्देएकंबा येथील घटना : तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिमायतनगर : तालुक्यातील एकंबा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने जागा बळकावण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याच्या धास्तीने एकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या आवारात प्रेत ठेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरत तब्बल ८ तास ठिय्या दिला.मयत युवक गजानन माधव नरवाडे (वय २७) याने गावातील घर क्रमांक २२० च्या जागेचे बांधकाम करण्यास ९ एप्रिल रोजी सुरुवात केली होती. घराचे काम सुरु असताना गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दत्ता पुंजाराम कोकेवाड, सौरभ दत्ता कोकेवाड, सरस्वताबाई दत्ता कोकेवाड, पुंजाराम महादा कोकेवाड यांनी मयत युवक गजानन माधव नरवाडे यांच्या बांधकामात अडथळा निर्माण करून सदरची जागा माझी आहे असा घाट घालत शिवीगाळ केली. आणि राजकीय वरदहस्ताने बांधकाम करण्यास अडथळा निर्माण करून घरालगतच तीन पत्रे टाकून जागा बळकावली. त्यामुळे मयत युवकाच्या आईची मनस्थिती बिघडून डोक्यावर परिणाम झाला.त्यामुळे मयत युवकाने याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध २२ एप्रिल रोजी तक्रार देऊन मानसिक स्थिती बिघडविणाऱ्या व मारण्याची धमकी देणाºयांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तसेच दिलेल्या तक्रारीत माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास यास कोकेवाड परिवार आणि त्यांचे सहकारी जबाबदार राहतील असेही नमूद करण्यात आले होते. परंतु, हिमायतनगर पोलिसांनी त्याच्या अर्जाची दाखल घेतली नसल्याने त्याच्या मनावर परिणाम होऊन १३ च्या मध्यरात्री युवकाने शेतातील तणनाशक हे विषारी औषध प्राशन केले. याची माहिती मिळताच तातडीने नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले़ उपचार सुरु असताना युवक गजानन माधव नरवाडे याची प्राणज्योत मालविली.या घटनेने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त करत हिमायतनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.सकाळी ८ वाजल्यापासून नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात प्रेत ठेवलेले असतानादेखील पोलिसांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला.पोलिसांनी जर मयताच्या अर्जाची दखल घेतली असली तर आज गजानन जिवंत राहिला असता असे म्हणत हंबरडा फोडला होता.दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दत्ता पुंजाराम कोकेवाड, सरस्वताबाई दत्ता कोकेवाड, सौरभ दत्ता कोकेवाड, पोलीस पाटील प्रेम गणपत पोगुलवाड आणि कैलास गणपत पोगुलवाड या पाच जणांवर कलम ३०६, ३४ भादंविनुसार मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटलासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून, वरील आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताा दिली.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूagitationआंदोलनPolice Stationपोलीस ठाणे