शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

नात्यांची वीण सैल होतेय, नांदेड जिल्ह्यात वर्षभरात साडेतीनशेंहून अधिक घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:50 IST

बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत.

नांदेड : सहजीवतील पती-पत्नीमधील हरवत चाललेला संवाद अन् मोबाइलच्या अतिरेकी वापर, त्यातून एकमेकांच्या मनात भटकणारे संशयाचे भूत आणि त्यातूनच सातजन्मासाठी बांधलेली गाठ सैल होत आहे. मागील वर्षाभरात नांदेड जिल्ह्यात साडेतीनशेंहून अधिक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले आहेत. कौटुंबिक न्यायालयात मागील पाच महिन्यात पावणेदोनशे प्रकरणे दाखल झाली आहेत.

अहिल्यानगर येथील वैष्णवी हगवणे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे पती-पत्नीतील नातेसंबंध आणि कौटुंबिक हिंसाचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बहुतांश शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरात आलेल्या सुनेकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारे वाददेखील सहा महिने, वर्षभरातच घटस्फोटाचे कारण ठरत आहेत. नांदेड जिल्हा कौटुंबिक न्यायालयात दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३३१ प्रकरणे दाखल झाली तर १ जानेवारीपासून आजपर्यंत मागील पाच महिन्यात १६४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये बहुतांश प्रकरणे ही आपापसात समेट घडवून मिटविली जात असली तरी अनेक प्रकरणात वर्षानुवर्षे वाद सुरू असतात. त्यामध्ये मुलं कुणाकडे राहणार, पोटगी यासह विविध मागण्या आणि विषयावर वाद-विवाद सुरू असतात.

किरकोळ कारणावरून वादकौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांपैकी ७० ते ८० टक्के दाम्पत्यांचे घटस्फोट मंजूर होतात. त्यातील बहुतांश प्रकरणे ही आपसी तडजोडीच्या घटस्फोटाची आहेत. नोकरीनिमित्त एकमेकांपासून दूर राहणे, पतीपेक्षा पत्नीला अधिक पगार अथवा मोठी नोकरी असणे, स्वाभिमानीवृत्तीचा अतिरेकी आव, काही प्रकरणात तर मोबाइल, सोशल मीडिया व गॅलरी असलेले लॉकदेखील घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर अनेक ठिकाणी लगेच अपत्य नको, एकच अपत्य हवे या विषयावरूनदेखील पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

घटस्फोटाची कारणं-संवादाचा अभाव की स्वाभिमानाची धुसफूस?या घटस्फोटांमागे अनेक कारणे समोर येतात. पती-पत्नीमधील संवादाचा अभाव, एकमेकांप्रती समजून घेण्याची कमी वृत्ती, मोबाइलच्या अतिरेकामुळे हरवलेली माणुसकीची नाळ, सासू-सासरे यांच्याशी होणारे वाद, एकत्र कुटुंब न आवडणं किंवा करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या नावे एकमेकांना वेळ न देणे आदी कारणे आहेत.

नाते टिकविणे गरजेचेघटस्फोटाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या सामाजिक रचनेत पती-पत्नी दोघांनाही करिअर, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं. यातून संवाद कमी होतो आणि संशय वाढतो. घरगुती हिंसाचाराची केसेसही त्याचबरोबर वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा स्त्रिया सहनशक्तीच्या पलीकडे जाऊनही गप्प बसतात, पण एक दिवस त्यांचा संयम तुटतो आणि तेव्हा या घटनांना वेगळे वळण लागते. कायदा महिलांच्या बाजूने आहे, पण त्याचा वापर सजगतेने आणि गरजेप्रमाणे व्हावा, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पती-पत्नीचे पवित्र नाते असून, ते टिकविणे गरजेचे आहे. कोर्टापेक्षा सामोपचाराने कुटुंबातच आपापसातील वाद मिटवून घ्यावेत.- ॲड. प्रसाद रानवळकर, वकील

म्युच्युअल घटस्फोटाचे प्रमाण अधिकन्यायालयात गेल्यानंतर लागणारा वेळ आणि समाजात होणारी बदनामी यातून अनेक दाम्पत्य कुटुंबांमध्येच म्युच्युअल घटस्फोट घेत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारदेखील होत आहेत. परंतु, भविष्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने झालेले घटस्फोट दोघांसाठीही अडचणीचे ठरू शकतात.

टॅग्स :NandedनांदेडDivorceघटस्फोट