शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रद्द केलेल्या भरतीची फीस परत करा; विद्यापिठासमोर मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 19:04 IST

फिस त्वरीत परत करावी या मागणीसाठी आज मनसे विद्यार्थी सेनेच्या वतिने विद्यापीठासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले .

नांदेड - स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठात विविध पदासाठी भरती करण्यात येणार होती मात्र ती भरती रद्द करण्यात आली . या भरतीसाठी ज्या उमेवारांनी फिस भरली होती त्या उमेदवारांची फिस त्वरीत परत करावी या मागणीसाठी आज मनसेविद्यार्थी सेनेच्या वतिने विद्यापीठासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले .

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठात सन २०१५ मध्ये विविध पदासाठी भरती करण्यात येणार होती . त्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन ईच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते . अर्जासोबत उमेदवारांना शुल्क आकारण्यात आले होते . परिक्षा शुल्क डीडी रुपात स्विकारण्यात आले . तत्कालीन परिस्थिती दुष्काळी होती तरिही नौकरी मिळेल या आशेवर  बेरोजगार उमदेवारांनी शुल्क भरले होते. ईच्छूक उमेदवारांनी अर्ज भरल्याने  परिक्षेची तयारी करीत होते . मात्र भरती रद्द झाल्याने उमेदवारांत नैराश्य निर्माण केले गेले. विद्यापिठ प्रशासनाने संबधित उमेदवारांशी सांधा संपर्क साधला नाही. भरती रद्द झाल्याचे कळविले नाही. तसेच बेजबाबदार प्रशासनाने उमेदवाराकडून घेतलेले शुल्कही परत केले नाही. सन २०१५ पासून ही रक्कम विद्यापिठ वापरत आहे . बेरोजगारांच्या मेहनतीवर विद्यापिठाने डल्ला मारला आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. 

संबधित उमेदवारांना त्या भरतीचे शुल्क व्याजासह परत करावे यासाठी आज सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टासिंग जहागिरदार , मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पा बरडे यांच्या नेतृत्वाखाली बोंब मारो आंदोलन करण्यात आले .यावेळी जिल्हाध्यक्ष रवि राठोड, शहराध्यक्ष शफीक अब्दुल, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड , गणेश तोगरवार, सुभाष भंडारी , महेश ठाकूर , शक्ती परमार , अनिकेत परमार , अंकित तेहरा , शिवराज पाटील , गजु यादव , शंकर सरोदे, सतिश वाघमारे, योगेश चौधरी, श्रीकांत देशमुख , बालाजी पावडे , कृष्णा पांचाळ, नारायण हिलाल, संतोष बनसोडे, रवि जाधव , मष्णाजी पा ., अमोल पोतलोड, शंकर पिटलेवाड, बजरंग पाबाळू, संजय भूसापले, सागर ठाकूर, अनिकेत परिदेशी आदिची उपस्थिती होती . फीस परत न केल्यास विद्यापिठास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .

टॅग्स :MNSमनसेswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थी