शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या कापूस बीटी वाणांची मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: December 15, 2023 18:18 IST

कापूस संशोधन केंद्राने विकसित केले तीन वाण, केंद्राच्या वाण प्रसारण समितीकडून प्रमाणित

नांदेड: वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्राने तब्बल आठ वर्षांच्या परिश्रम व संशोधनानंतर कापसाचे तीन बीटी वाण विकसित केले आहेत. सदर वाणाची केंद्रीय वाण प्रसारण समितीच्यावतीने मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली असून, हे वाण लवकरच बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

येथील कापूस संशोधन केंद्रात २०१५ पासून एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ या बीटीच्या सरळ वाणावर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. या वाणाची लक्षणे बीटी स्वरुपातील सरळ वाण असून, नांदेड संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेले आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल असून, कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेले आहे. हे वाण रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील असून, त्याच्या धाग्याची लांबी मध्यम स्वरूपाची आहे. हे वाण कोरडवाहू भागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे. नांदेड कापूस संशोधन केंद्रात मोठ्या आकाराच्या सरळ व संकरीत वाणांची पैदास करणे, सधन लागवडीसाठी अनुकूल वाणांची पैदास, उत्पादन वाढ करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान या विविध विषयांवर संशोधन सुरू आहे.

पुढील वर्षी बियाणे म्हणून करता येतो वापरसदर वाण हे सरळ असल्यामुळे मागील वर्षीच्या कपाशीपासून सरकी वेगळी करून पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे प्रत्येक वर्षी बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता असणार नाही. बियाण्यांवरील खर्चही कमी करण्यास मदत होणार आहे.

बोंडअळीला प्रतिकारकया वाणांमध्ये बीजी स्वरूपातील जनुकांचा अंतर्भाव असल्यामुळे हिरवी व ठिपक्याच्या बोंडअळीला हे वाण प्रतिकारक ठरणार आहे. पण, गुलाबी बोंडअळीवर याचा प्रभाव दिसून येईल की, नाही याबाबात निश्चित सांगणे कठीण आहे.

नांदेड कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेले तीनही वाण हे बीटी स्वरुपातील असल्यामुळे यावर हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी यांना प्रतिकाकारक राहतील.- डी.के.एस. बेग, कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र नांदेड

हे वाण सरळ वाण प्रकारात असल्यामुळे त्याच्या बियाण्यासाठी बाजारातून खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही.- ए. डी. पांडागळे, कृषी विद्यावेता, कापूस संशोधन केंद्र नांदेड.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNandedनांदेड