शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:36 IST

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कशाप्रकारे दर आकारावेत याची नियमावली शासनाने घालून दिली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळी, उन्हाळी सुट्यांत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणार आर्थिक लूट थांबणार आहे़

ठळक मुद्देशासन निर्णयाने प्रवाशांना दिलासा जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर होणार कारवाई

नांदेड : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कशाप्रकारे दर आकारावेत याची नियमावली शासनाने घालून दिली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळी, उन्हाळी सुट्यांत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणार आर्थिक लूट थांबणार आहे़ ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीविरोधात आता प्रवाशांना अधिकृत क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे़नांदेड येथून पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर धावणा-या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी आहे़ त्यात दिवाळी, महालक्ष्मी, गौरी पूजन आणि उन्हाळी सुट्यांमध्ये मोठी वाढ होते़ पुण्याला दिवाळीच्या सुट्यांमध्ये दोनशेहून अधिक ट्रॅव्हल्स दररोज धावतात़ परंतु, प्रवाशांची गर्दी आणि गरज लक्षात घेवून खासगी ट्रॅव्हल्सचालक तिकिटांमध्ये तीन ते चार पट वाढ करून प्रवाशांची सर्रास लूट करीत असतात़ वातानुकूलित गाडी नसताना तशाप्रकारचे भाडे आकारले जाते़ मात्र, यापुढे प्रवाशांना अधिकृतपणे तक्रार नोंदविता येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे़शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर किलोमीटरनुसार ठरवून दिले आहे़ त्यापेक्षा जादा भाडे आकारणा-या ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात प्रवाशांना टोल फ्री क्रमांक ०२२-६२४२६६६६ या क्रमांकावर अथवा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आॅनलाईन तक्रार नोंदविता येवू शकते़ शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिकिलोमीटरच्या दरावरून अंदाजित नांदेड येथून लागणारे भाडे काढले आहेत़ यामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त भाडे होवू शकते़ यामध्ये नांदेड येथून परभणीमार्गे पुणे एसी स्लिपरसाठी १४८१ रूपये, परळीमार्गे पुणे- १४६५ रूपये तर लातूरमार्गे पुणे- १५५० रूपये असे तिकीट दर आकारता येवू शकतात़ तर निमआराम एसी गाडीसाठी १००० ते ११०० रूपयांपर्यंत तिकीट घेता येवू शकतात़ तसेच नांदेड - नागपूर निमआराम सिटींग गाडीसाठी ८०० ते १०० रूपये आणि स्लिपर एसीसाठी ११०० ते १३०० रूपये, नांदेड - कोल्हापूरसाठी सिटींग ११०० रूपये तर स्लिपरसाठी १५०० ते १६०० रूपये आणि मुंबईसाठी सिटींग १३०० ते १३५० रूपये आणि स्लिपर एसी गाडीसाठी १९०० ते २००० रूपये तिकीट गर्दीच्या कालावधीत आकारता येवू शकतात़ परंतु, यापुढे ट्रॅव्हल्सचालकांच्या मनमानीवर लगाम बसेल़

  • नांदेड येथून पुणे, कोल्हापूर, नागपूर या मार्गावर शिवशाही बसेस सोडल्या आहेत़ त्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत़ यामध्ये नागपूरसाठी ७४० (सिटींग), ९७५ (स्लिपर), नांदेड - पुणे ९५० (सिटींग) तर स्लिपरसाठी १२४५ रूपये, कोल्हापूर - ९७५ (सिटींग), १२७५ (स्लिपर) तर सोलापूरसाठी सिटींग गाडीसाठी ५२० रूपये तिकीट आहे़
  • प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ट्रॅव्हल्सच्या अवाजवी भाडेवाढीवर अंकुश ठेवण्याबरोबर सुविधांची तपासणी करणे गरजेचे आहे़ ब-याच गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, सिट बेल्ट आदी आवश्यक बाबी नसतात़
  • नांदेडचे हजारो विद्यार्थी शिक्षण, नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत़ त्यामुळे दिवाळीत गावी येणाºयांचे प्रमाण मोठे असते ही बाब लक्षात घेवून पुणे, मुंबईसाठी दिवाळीत विशेष रेल्वे, बसेस सोडणे गरजेचे आहे़
टॅग्स :NandedनांदेडFairजत्राBus Driverबसचालक