शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

राज ठाकरेंच्या सभेने काँग्रेसला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:17 IST

पाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले.

ठळक मुद्देमनसेच्या सभेला प्रतिसाद नवा मोंढा मैदान तुडुंब; भाजपावर घणाघाती टीका

विशाल सोनटक्के।नांदेड : पाच वर्षानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतलेल्या राज ठाकरे यांनी नांदेड मतदारसंघात भाजपाच्या अडचणी आणखीणच वाढविल्या आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या भाषणाचे पाच व्हिडीओही सादर केले. सभेला लोटलेला जनजागर आणि या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर केलेल्या घणाघाती टीकेमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण, भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यात सामना रंगला आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रचाराच्या अनुषंगाने जिल्हा पिंजून काढला आहे. त्यातच १५ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मनसेच्या वतीने झालेली राज ठाकरे यांची सभाही काँग्रेससाठी ‘बोनस’ ठरणार आहे.सभेच्या प्रारंभीच राज ठाकरे यांनी माझा पक्ष या निवडणुकीत उभा नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात कोणीतरी बोलले पाहिजे. वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे, त्यासाठीच ही सभा घेत असल्याचे सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. महाराष्टÑ तसेच देशाने मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाकडे सत्ता सोपविली. मात्र निवडणुका संपल्यानंतर हा माणूस वेगळाच असल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षांत या सरकारने तमाम महाराष्ट्रवासियांची घोर फसवणूक केल्याचे सांगत, राज ठाकरे यांनी मंचावर उभारलेल्या दोन स्क्रिनवर मोदींचे व्हिडीओ सादर केले. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या प्रत्येक वक्तव्यानंतर उपस्थित जनसमुदायातून भाजपाविरोधात अत्यंत तीव्र शब्दात घोषणाबाजी होत होती. सभेला लाभलेला तुडुंब प्रतिसाद आणि राज ठाकरे यांनी सभेच्या माध्यमातून भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रश्नांची मालिकाच उपस्थित केली. राज ठाकरे यांच्या सभेतील ही वक्तव्ये तसेच त्यांचे व्हिडीओही रात्रीपासूनच सोशल मीडियावर व्हॉयरल झाल्याने अगोदरच अडचणीत असलेल्या भाजपाची राज ठाकरेंच्या या सभेने आणखीनच कोंडी केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात भाजपाच्या प्रचारातील मुद्दे निशाण्यावर राहिले. त्यामुळे प्रचाराच्या उर्वरित दिवसांत भाजपा उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचाही हे प्रश्न पिच्छा सोडणार नसल्याने ते कसे उत्तर देतात, हे पहावे लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडRaj Thackerayराज ठाकरे