शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:38 IST

जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता.

ठळक मुद्देतीन तालुक्यांत अतिवृष्टी : जनजीवन झाले विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता. हिमायतनगर तालुक्यात जोराच्या पावसामुळे ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या तर तालुक्यातील पोटा येथील पूल वाहून गेला. त्यामुळे भोकर-किनवट वाहतूक सुमारे वाहतूक पाच तास ठप्प होती. नांदेड शहरातही चांगला पाऊस झाला.भोकर तालुक्यात १०५ मि.मी. पाऊसभोकर - तालुक्यात सतत दोन दिवसापासून रात्रीला होत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असले तरी मानसूनपूर्व वादळी वारे व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड होवून विद्युत खांब व झाडे आडवी पडून नुकसान होत आहे. यातचतालुक्यात मंडळनिहाय मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण पुढील प्रमाणे, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस- भोकर - ४० (४४) मि.मी. मोघाळी - ६५ (१८१) मि.मी., मातुळ - ०० (२०) मि.मी., किनी - ०० (३४)मि.मी. अशा प्रकारे तालुक्यात एकूण १०५ (३१९) मि.मी. तर मंगळवारी रात्री सरासरी पाऊस - २६.२५ मि.मी. होवून आतापर्यंत सरासरी ७९.७५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतीवृष्टी झालेल्या मोघाळी मंडळातील मोघाळी, धारजणी शिवारात बुधवारी शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरवात केली आहे.

---हिमायतनगरमध्ये जनजीवन विस्कळीतहिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती़ शहरातील ४५ मेंढ्या तर एका मिस्त्रीची सेंट्रिंग वाहून गेल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला़ दोन तासात सगळीकडे पाणीच पाणी झाले़ नदी-नाले भरभरून वाहू लागले़ अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे़ यावेळी एकच तारांबळ उडाली़ त्यामध्ये घरातील साहित्य कडधान्ये भिजल्यावर मोठे नुकसान झाले़ तसेच रेल्वेस्थानक रस्त्यालगत पुराचे पाणी साचल्यामुळे मेंढ्यांचा व्यवसाय करणाºया म. समीर आणि अ. बशीर यांच्या जवळपास ४५ मेंढ्या गुदमरुन दगावल्या आहेत. हिमायतनगर शहरातील अनेक वार्डातील घरामध्ये पावसाचे पाणी गेले होते़ नगराध्यक्षांच्या वार्ड क्र. ३ मध्ये अनेक नागरिकांच्या घरात नालीचे घाण पाणी गेल्याने घरातील साहित्य व कडधान्ये भिजले तर शेख हसन यांच्या घरातील साखरेचे पोते, खताचे पोते भिजून मोठे नुकसान झाले आहे़ भटक्यांनी लावलेल्या राहुट्या वाहुन गेल्या होत्या़ बचावासाठी मुलाबाळांसह डांबरी रस्त्यावर घेऊन थांबावे लागले येथील मिस्त्री युनूस मिस्त्री यांची १.५ लाखाची लाकडे (सेंट्रिंग) वाहून गेली वडगाव येथील शेतकरी भीमराव पाटील यांच्या शेतातील दोन एकरमधील हळद लावलेली मातीसह खरडून गेली आहे़ टाकराळा येथील लाव्हाळे यांची दहा एकर शेती खरडून गेल्याने जमीन नापीक झाली़ नदी नाल्या शेजारील अनेक शेतकºयांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत़ हिमायतनगर शहरात ११४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सरसम बु.७० मिलीमिटर, जवळगाव ९५ मिलीमीटर एकूण १५९.४ मिलीमीटर पाऊस झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आली आहे.---धानोºयात घर कोसळले, कुटुंबिय थोडक्यात बचावलेभोकर $: तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवित हानी टळली. तर दुसºया घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकºयाचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री ८.३० वाजता धानोरा येथील पांडुरंग ग्यानोबा कुरुकवाड यांचे कौलारु घर कोसळले. यावेळी विद्यूत पुरवठा खंडित झाल्यामुळे कुरुकवाड कुटुंबातील पती, पत्नी, वडील व ६ वषार्चा मुलगा ओसरीत झोपलेले असल्यामुळे जीवित हानी टळली. तर भगवान धगरे यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम ढासळले.---रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य ; अनेक मार्गांवरील वाहतूक वळविलीहदगाव तालुक्यातील पोटा येथील पुलाखालचे बेडच खरडून गेले तर तात्पुरता बनवलेला रस्ता सर्वच वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे आणि पारवा येथील वाहतुकीसाठी बनवलेला पूल पुराच्या पाण्याने जमिनीतून खरडून गेला या दोन्ही पुलांनी गुत्तेदाराची निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली असृन वाहतूक ठप्प झाली आहे हिमायतनगर ते इस्लापूर महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहने घसरत होती दोन चाकी वाहनाच्या चाकाच्या मडगाडात चिखल अडकून बसत असल्याने दुचाकीस्वारांची दमछाक होत होती. किनवट मार्गे नांदेड कडे जाणारी वाहतूक सोनारी फाटा येथून हदगाव मार्गे नांदेड कडे वळवली आहे. नांदेड किनवट मार्गे येणारी वाहतूक हदगाव मार्गे किनवट जात आहे. सदरील पुलाखालील जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन दिवस तरी लागतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसWaterपाणी