शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय; पीकांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:17 IST

गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला़ रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे़

ठळक मुद्दे दरम्यान, जिल्ह्यात ७२़८३ टक्के पेरण्या झाल्या असून पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे़ 

नांदेड : गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला़ रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे़ दरम्यान, जिल्ह्यात ७२़८३ टक्के पेरण्या झाल्या असून पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे़ 

मृग नक्षत्रावर झालेल्या पावसामुळे वेळेवर पेरण्यांना सुरूवात झाली होती़ परंतु, काही दिवसातच पावसाने उघडीप दिल्याने पन्नास टक्क्याहून अधिक पेरण्या रखडल्या होत्या़ दहा ते बारा दिवसाच्या उघडीपीनंतर झालेल्या पावसामुळे पेरण्यांन पुन्हा गती मिळून जवळपास ७२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या़ मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पीके माना टाकून देत होती़ दरम्यान, गुरूवारी सायंकाळी रिमझिम पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने पीकांना जीवदान मिळाले असून बळीराजा सुखावला आहे़ त्यातच रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे़.

चोवीस तासात १७.७३ मि़मी़ पावसाची नोंदयामध्ये सर्वाधिक ३४ मि़ मी़पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला आहे़ त्याखालोखाल भोकर - २८़७५ मि़मी़, नांदेड - २७़१३ मि़मी़, मुदखेड - २५़६७ मि़मी़, उमरी - २३ मि़मी़, कंधार- १२़३३ मि़मी़, लोहा - २२़१७ मि़मी़, किनवट - १६़४३ मि़मी़, माहूर - २५़७५ मि़मी़, हदगाव- १३़७१ मि़मी़, हिमायतनगर - १२ मि़मी़, देगलूर - १४ मि़मी़, बिलोली - ६़८० मि़मी़, धर्माबाद - ६ मि़मी़, नायगाव- ८़२० मि़मी़, मुखेड - ७़७१ मि़मी़  असा एकूण २८३़६५ मि़मी़ पाऊस झाला असून गुरूवारी सरासरी १७़७३ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाची रिमझिम सुरूच आहे़.

जिल्ह्यात ७३ टक्के पेरणी पूर्णनांदेड जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्यांना वेळेवर सुरूवात झाली़ आजपर्यंत ७३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख  २४ हजार ८२० हेक्टर असून त्यापैकी जवळपास सहा लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे़ यामध्ये सर्वाधिक १२०़४० टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे़ सोयाबीनचे सर्वसाधरण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर गृहित धरलेले असताना २ लाख ३९ हजार ७०३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तर कापसाच्या सर्वसाधारण ३ लाख २३ हजार ७५४ हेक्टरपैकी २ लाख ३० हजार ७९० हेक्टरवर म्हणजेच ७१़२९ टक्के कापसाची लागवड झाली आहे़.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसNandedनांदेड