शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या रॅकेटचा फर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:33 IST

मुलींना फूस लावून पळविणे व त्यांच्याकडून  देहविक्रीचा व्यवसाय करणारे रॅकेट उघड

ठळक मुद्देचार महिलांसह तिघे गजाआड लोहा पोलिसांची कारवाई

लोहा (जि.नांदेड) : लोहा व परिसरासह राज्यात मुलींना फूस लावून पळविणे व त्यांच्याकडून  देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा लोहा पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला.  यात चार महिला व तीन पुरुषांना गजाआड केले आहे. पीडितेच्या आईने चार महिन्यांपूर्वी लोहा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

इंदिरानगर येथील ३५ वर्षीय महिलेने ४ फेब्रुवारी रोजी लोहा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ‘माझ्या मुलीस आरोपी कमलबाईने फूस लावून पळवून नेले, मुलीला अनैतिक व्यवहार करायला लावत आहेत. याबाबत मी विचारले असता, मला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.’ तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला.  आरोपीची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत मिळविली. आरोपी तान्याबाई ऊर्फ विमलबाई अशोक जाधव (वय ४८ रा. पेनूर ता. लोहा) हिस पेनूर येथून तर कमलाबाई मोहन ऐंगडे (वय ४८, रा. इंदिरानगर लोहा) यांना हैदराबाद येथून दहा दिवसांपूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर रॅकेटमधील इतर आरोपींपैकी विमलबाई खंडू पाईकराव (५५, रा. बेलानगर, नांदेड) व महानंदाबाई रोहिदास वाटोरे (वय ४५, रा. पांडुरंगनगर, नांदेड) यांना नांदेड येथून ताब्यात घेतले.

या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर गेनूभाऊ आबाजी हिंगे (रा. अवसारी जि. पुणे), मदन किशन गिरी (रा. सतेगाव ता. पालम) व राहुल बंडूराव ढवळे (रा. विष्णूनगर नांदेड) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लोहा पोलीस ठाण्याचे पो. नि. भागवत जायभाये, सपोनि रवींद्र कºहे, पोउपनि गुलाबसिंह राठोड, पोहेकॉ बालभारती, वसंत केंद्रे, बलवान कांबळे, शेषराव शिंदे, सविता जोंधळे आदींसह पोलीस पथकाने सदर कामगिरीत सहभाग घेतला. 

आणखी आरोपी असण्याची शक्यताच्रॅकेटमध्ये इतरही आरोपी असावेत, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  या रॅकेटमधील आरोपींविरुद्ध पालमसह इतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी विकणे आदीप्रकरणी गुन्हा नोंद आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस